जेव्हा लांबचा प्रवास करतो, किंवा काही दिवसासाठी बाहेर जातो. तेव्हा मोठी बॅग घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे आपण थोडंच सामान घेऊन जातो. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही, कोणते सामन बॅगमध्ये ठेवावे. विशेषतः मेकअप आणि स्किनकेअर प्रॉडक्ट. स्किनकेर आणि मेकअप प्रॉडक्ट हे खूप असल्यामुळे महत्वाचं कोणतं सामान ते देखील कळत नाही. आज आपण जाणून घेऊयात, ट्रॅव्हलिंग करताना कोणते ३ कॉस्मेटीक आपण कॅरी करू शकताे.
लिप बाम
हिवाळा सुरु असल्यामुळे आपले ओठ लगेच ड्राय होतात. लिपस्टिक लावली तर अजून ड्राय दिसतात. थंडीच्या दिवसात ट्रॅव्हलिंग करताना ओठ सहजपणे कोरडे होतात अशावेळी तुम्ही बॅगमध्ये लिप बाम लावू ठेवू शकता. लीप बाम लावल्यामुळे तुमच्या ओठांना तडे जाणार नाही. कोरडे देखील पडणार नाही. हे लीप बाम तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल . तसेच तुम्ही हे लीप बाम घरी देखील बनवू शकता.
फ्रेगरेंस
लांबचा प्रवास करताना नेहमी तुमच्या बॅगमध्ये पॉकेट परफ्युम निश्चित ठेवा. बऱ्याचदा लांबचा प्रवास करताना, खूप घाम येतो. अशावेळी तुम्ही परफ्युम वापरून शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीपासून तुम्हाला सुटका मिळेल. हल्ली बऱ्याच ठिकाणी पॉकेट परफ्युम मिळतात. हे पॉकेट परफ्युम लहान बॅगमध्ये देखील राहील.
सनस्क्रीन
सनस्क्रीन लावल्याशिवाय जास्त वेळ घराबाहेर पडू नये, सनस्क्रीन न लावल्यामुळे तुमची त्वचा काळी पडू शकते. तसेच चेहरा देखील टॅन होऊ शकतो. त्यामुळे घरा बाहेर जाताना सनस्क्रीन लावून बाहेर जाऊ शकता. जर तुम्ही जास्त सनस्क्रीन लावत असाल तर, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना मिनी स्प्रे वापरू शकता. हा एक उत्तम पर्याय आहे.
काजळ
तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना काजळ देखील कॅरी करू शकता. काजळ हे कोणत्याही बॅगमध्ये सहजपणे जाईल. काजळ लावल्याने तुमचा चेहरा डल देखील दिसणार नाही.
हेही वाचा : Beauty Tips : फेस सीरम अप्लाय करताना घ्यावी काळजी
Edited By : Prachi Manjrekar