Prepare time: 10 min
Cook: 10
Ready in: 30 min
Ingredients
- उकळलेले बटाटे 1
- कांदा 2
- गाजर 2
- हिरवी मिरची 2
- आलं लसूण पेस्ट 2 चमचे
- कोथिंबीर 2
- गरम मसाला 3 चमचे
- कॉर्न फ्लोर – 2 चमचे
- ब्रेडचा चुरा 1 कप
- मीठ चवीप्रमाणे
- मैदा
- कॉर्न फ्लोर - 1/4 कप
- ठेचलेली काळी मिरी - 1/4 चमचे
Directions
- एका वाटीमध्ये पनीरचा केलेला चुरा, उकळलेले बटाटे घालून सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या.
- आता यामध्ये कांदा, गाजर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
- मिक्स करून घेतल्यावर यामध्ये चवीप्रमाणे मीठ, गरम मसाला घालून मिश्रण चांगले स्मॅश करून घ्या.
- या तयार केलेल्या मिश्रणात कॉर्न फ्लोर घालून मऊ स्टफिंग तयार करून घ्या.
- तुम्ही गरजेनुसार कॉर्न फ्लोअरचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.
- यानंतर तयार मिश्रण बाजूला ठेवा.
- एका बाजूला १ ते ४ कप कॉर्न फ्लोअर, मैदा,चवीनुसार मिरपूड 1/4 कप पाणी घालून चांगले मिसळा.
- तुमच्या हातांना थोडं तेल लावून तयार केले पनीरच मिश्रण गोल करून ब्रेडक्रम्बसमध्ये आणि कॉर्न फ्लोअरच्या तयार केलेल्या मिश्रणात घोळवून फ्राय करून घ्या.
- फ्राय करून झाल्यावर याचा आस्वाद तुम्ही चटणीसह घेऊ शकता