Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 40- 45 mins
Ingredients
- पनीर - 1 ते 2 कप
- उकडलेले बटाटे - 3
- कापलेल्या हिरव्या मिरच्या - 2
- सिमला मिरची
- गरम मसाला
- चाट मसाला
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- लाल तिखट
- ब्रेड क्रम्ब्स - 2 वाटी
- मैदा
- तेल
- मीठ
Directions
- सर्वात आधी पनीर आणि उकडलेले बटाटे एका भांड्यात किसून घ्यावेत.
- यानंतर सिमला मिरची कापून घ्यावी आणि पनीर, बटाट्याच्या मिश्रणात एकजीव करावी.
- तयार मिश्रणात कापलेल्या हिरव्या मिरच्या, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीपूरते मीठ घालावे.
- मिश्रणाचे छोटे छोटे लॉलीपॉप आकारात गोळे करून घ्यावेत.
- यानंतर लॉलीपॉपचे आवरण तयार करण्यासाठी मैदामध्ये पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यावे.
- पनीरच्या गोळ्यांना मैद्याच्या मिश्रणामध्ये बूडवून ब्रेडक्रम्समध्ये घोळवून घ्यावेत.
- तेल कढईत गरम करण्यास ठेवा. तेल गरम झाले की पनीरचे लॉलीपॉप तळून घ्यावेत.
- तयार लॉलीपॉपला स्टिक लावायला विसरू नका.
- तुमचे पार्टी स्पेशल असे पनीरचे लॉलीपॉप तयार झाले आहेत.