Sunday, February 9, 2025
HomeमानिनीRecipePaneer Chana Salad Recipe : झटपट बनवा पौष्टिक पनीर चणा सलाड

Paneer Chana Salad Recipe : झटपट बनवा पौष्टिक पनीर चणा सलाड

Subscribe

अनेकांची सकाळ सलाड खाऊन होते. कांदा, काकडी आणि टोमॅटोचे सलाड नेहमीच खाल्ले जाते. जिभेला थोडी वेगळी चव मिळावी यासाठी पौष्टिक पनीर चणा सलाड बनवू शकता.

Prepare time: 5 min
Cook: 10 min
Ready in: 15 min

Ingredients

  • पनीर - 2 वाटी
  • उकडलेले हरभरे - एक वाटी
  • कांद्याची पात -
  • काळी मिरी पावडर - चिमूटभर
  • काळे मीठ - चवीनुसार
  • चाट मसाला - चिमूटभर
  • लिंबाचा रस - 1 चमचा

Directions

  1. हरभरे रात्रभर भिजत ठेवा आणि सलाड करतेवेळी हरभरे प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावेत.
  2. पनीर थोडे तेल टाकून हलके भाजून घ्यावेत तुम्ही कच्चे पनीरही वापरू शकता.
  3. हरभरे शिजल्यावर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावेत. त्यात पनीरचे लहान तुकडे मिक्स करावेत.
  4. त्यात आता काळी मिरी पावडर, काळे मीठ आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करावे.
  5. यानंतर तयार सॅलेडमध्ये थोडासा लिंबाचा रस घालून पुन्हा मिक्स करुन घ्यावे.
  6. शेवटी कांद्याची पात चिरुन घालावी.
  7. अशाप्रकारे तुमचे झटपट तयार होणारे पौष्टिक पनीर चणा सलाड तयार झाले आहे.

Manini