Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- रवा - एक वाटी
- पपईचा गर - एक वाटी
- साखर - अर्धी वाटी
- दूध - एक वाटी
- वेलचीपूड - 1 चमचा
- काश्मिरी केसर इसेन्स - अर्धा चमचा
- ड्रायफ्रूट्स - आवडीनुसार
- तूप - अर्धी वाटी
Directions
- तवा गरम करत ठेवा आणि त्यात मंद आचेवर थोडं तूप टाकून त्यावर रवा भाजून घ्या.
- पपई आणि साखर मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या.
- आता एका कढईत हे पपईचे मिश्रण घ्या आणि त्यात भाजलेला रवा टाकून एकजीव करुन घ्या.
- यामध्ये दूध टाकून मिक्स करा व झाकण लावून 5 मिनिटांकरता शिजू द्या.
- सुका मेवा, इसेन्स, वेलची पावडर आणि उरलेले तूप टाकून खरपूस भाजून घ्या.
- अशाप्रकारे आपला पपईचा शिरा तयार आहे.