Prepare time: 15 min
Cook: 10 min
Ready in: 20- 25 min
Ingredients
- मटार - 1 वाटी
- स्वीट कॉर्न - 1 वाटी
- उकडलेला बटाटा - 1 ते 2
- भिजवलेले पोहे - पाव वाटी
- आल-लसूण पेस्ट - 1 चमचा
- मिरची - 1 ते 2
- कोथिंबीर
- मीठ
- रवा
- तेल
Directions
- मटार आणि स्वीट कॉर्न पाण्यात उकळवून घ्यावेत.
- यानंतर मटार आणि स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.
- एका प्लेटमध्ये मटार, स्वीट कॉर्न, उकडलेला बटाटा, आलं लसूण पेस्ट, भिजवलेले पोहे, चिरलेली कोथिंबीर एकजीव करून घ्यावी.
- तयार मिश्रणाचे कटलेटच्या आकारात गोळे तयार करून घ्यावेत.
- पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे.
- तेल गरम झाले की, कटलेट रव्यात घोळवून तेलात शॅलो फ्राय करून घ्यावेत.
- तुमचे हेल्दी मटार-कॉर्न कटलेट तयार झाले आहेत.