Friday, September 29, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary Pink Tax- पिंक टॅक्स म्हणजे काय? जो फक्त महिलांनाच भरावा लागतो

Pink Tax- पिंक टॅक्स म्हणजे काय? जो फक्त महिलांनाच भरावा लागतो

Subscribe

पिंक टॅक्स हा अन्य टॅक्सपेक्षा वेगळा असतो. हा तो टॅक्स असतो जो महिलांसाठी असलेल्या उत्पादनांवर लागू होतो.

पिंक म्हणजे गुलाबी रंग जो महिलांचा ऑल टाईम फेवरेट रंग आहे. त्यामुळे पिंक रंग हा प्रामुख्याने महिलांचा रंग म्हणून ओळखला जातो. पण तुम्हांला हे वाचून धक्का बसेल की जसा इनकम टॅक्स, सेल्स टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि सर्विस टॅक्स असतो तसाच पिंक टॅक्सही Pink Tax असतो. जो महिलांसाठी असलेल्या उत्पनांवर आकारला जातो. यामुळे महिला ज्या काही वस्तू स्वता:साठी घेतात त्यावेळी त्या टॅक्सही देत असतात. पण गंमत म्हणजे याबदद्ल अनेकजणींना काहीही माहित नसते.

- Advertisement -

पिंक टॅक्स हा अन्य टॅक्सपेक्षा वेगळा असतो. हा तो टॅक्स असतो जो महिलांसाठी असलेल्या उत्पादनांवर लागू होतो. ते विकत घेण्यासाठी महिलांना वस्तूच्या किंमतीबरोबरच हा टॅक्सही भरावा लागतो. प्रामुख्याने महिलांच्या बॅग्ज, परफ्युम, कपडे, पेन, सँडल, चपलाच नाही तर दर महिन्याला पिरियडला वापरण्यात येणारे सॅनिटरी पॅड्स, टॅम्पोन इत्यादी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्या या वस्तूंच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त किंमतीत त्या विकतात. यालाच पिंक टॅक्स असे म्हणतात. इतर उत्पादनांच्या तुलनेत महिलांच्या वस्तूंवर पिंक टॅक्स 7 टक्क्यांनी जास्त असतो. तर पर्सनल केयरशी संबंधित उत्पादनावर हाच पिंक टॅक्स 13 टक्क्यानी जास्त आकारला जातो.

- Advertisement -

या पिंक टॅक्सची सुरुवात ही 1990 साली कॅलिफोर्नियामधून झाली. कॅलिफोर्नियाच्या असेंब्ली ऑफिस ऑफ रिसर्चच्या अहवालानुसार तेथील जवळजवळ 64 स्टोअर्स लाँड्रीज मध्ये अंदाधुंद कारभार सुरू होता. कपडे धुण्यासाठी ते इस्त्री करुन देण्यासाठी महिला आणि पुरुषांकडून वेगवेगळे दर वसूल केले जात होते. ज्यावेळी महिलांना याबद्दल समजलं त्यावेळी महिलांनी या भेदभावाविरोधात आवाज उठवला. त्यावेळी या स्टोअर्स लाँड्रीज विरोधात तपास करण्याचे आदेश देण्यात आले. तपासणीवेळी संपूर्ण मार्केटमध्येच असे जाळे पसरल्याचे लक्षात आले. त्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. त्यानंतर 2023 च्या सुरूवातीलाच अपडेट मिळाली कि यापुढे लिंगभेदाच्या आधारावर कोणत्याही उत्पादनावर अतिरिक्त किंमत वसुल केली जाणार नाही. कॅलिफोर्नियाच्या आधी 2020 साली न्यूयॉर्कने देखील असाच नियम बनवला. त्याला पिंक’ टॅक्स रिपील अॅक्ट’ असे नाव देण्यात आले.

या नव्या नियमानुसार महिलांसाठी आणि पुरुषांसाठी तयार करण्यात येणाऱ्या फेस क्रिम किंवा लोशन या उत्पादनात जर सारख्याच वस्तूंचा वापर करण्यात आला असेल तसेच या वस्तूंच्या निर्मितीसाठी जर सारखाच वेळ लागत असेल तर या उत्पादनांची किंमतही सारखीच असावी असा नियम करण्यात आला. जी कंपनी किंवा ब्रँड या नियमांचे पालन करणार नाही त्याच्याकडून १० हजार डॉलर दंड वसूल करण्याचा नियम करण्यात आला तसेच जो दंड भरणार नाही किंवा दंड भरण्यास टाळाटाळ करेल त्या कंपनीकडून १ लाख डॉलरचा दंड वसूल केला जाईल असे या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे.

महिलांच्या ज्या उत्पदनांवर हा पिंक टॅक्स आकारण्यात येतो त्यांची यादीही भलीमोठी आहे.उदा. हेअर केअर उत्पादने,बॉडी लोशन, वॉश ,मेकअपसाठी लागणारे सगळेच कॉस्मेटीक. पण महिलांसाठी आणि पुरुषांसाठी असलेल्या या वस्तूंच्या किंमतीमध्ये मात्र बराच फरक असतो. विशेष म्हणजे हा फऱक फक्त महिला किंवा पुरुषांच्या वस्तूंमध्येच नाही तर लहान मुल आणि मुलींच्या वस्तूंमध्येही आहे. लहान मुलींचे फ्रॉक किंवा खेळण्याच्या किंमती या मुलांच्या कपडे किंवा खेळण्यांच्या तुलनेत महाग असतात. फऱक फक्त रंगाचा असतो. हाच आहे पिंक टॅक्स. जो आपण महिला नकळत भरतोय.

- Advertisment -

Manini