Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- मटार - एक वाटी
- मध्यम आकाराचे बटाटे - 2 ते 3
- मैदा - एक वाटी
- हिरव्या मिरच्या - 3 ते 4
- हळद - अर्धा टीस्पून
- आमचूर पावडर - एक चमचा
- ओवा - अर्धा टीस्पून
- कुटलेले आले - अर्धा इंच
- मीठ - चवीनुसार
- तेल - तळण्यासाठी
Directions
- प्रथम मटार आणि बटाटे उकडून घ्यावेत. बटाटे मटार एकत्र एका बाऊलमध्ये घेऊन त्यात हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, आमचूर पावडर, मीठ, हळद, आले घालून कुस्करून घ्यावं.
- मैद्यामध्ये ओवा, मीठ थोडं तेल घालून मळून घ्या.नंतर मैद्याची पोळी लाटून घ्यावी.
- त्यावर बटाटे-मटारचं सारण लावून गुंडाळी करा. अशाप्रकारे सर्व पिठाचे रोल्स करून घ्यावेत.
- रोल काही मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवावे. नंतर रोल कापून त्याच्या चकत्या तयार करून घ्याव्यात.
- कापलेल्या चकत्या आता मैदा आणि पाण्याच्या मिश्रणात घोळवून घ्या. नंतर त्या भाजून किंवा तळून घ्या.
- सॉस आणि पुदिना चटणीसोबत हे सर्व्ह करा.