Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- स्वच्छ केलेली कोळंबी
- कांदा - खोबऱ्याचे वाटण
- कडीपत्ता
- लाल तिखट
- हळद
- मालवणी मसाला
- तेल
- चिंच
- कोथिंबीर
Directions
- सर्वात पहिले तर कांदा- खोबऱ्याचे वाटण तयार करून घ्यावे.
- यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे.
- तेल गरम झाले की, त्यात कडीपत्याची फोडणी द्यावी.
- फोडणीला सुगंध आला की त्यात वाटण टाका आणि व्यवस्थित परतून घ्यावा.
- यामध्ये चिंच, लाल तिखट, हळद आणि मालवणी मसाला टाकावा आणि परतून घ्यावे.
- मसाल्याला तेल सुटल्यावर त्यात कोळंबी टाकावी
- कोळंबी 5 ते 7 मिनीटे परतून घ्यावी.
- कोळंबी शिजत आल्यावर चवीपूरते मीठ टाकावे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही मिक्स करावी.
- तुमचा झणझणीत कोळंबी मसाला तयार झाला आहे.