Thursday, March 27, 2025
HomeमानिनीHealthPre Holi Skin Care Tips : होळीच्या रंगांपासून कसा कराल त्वचेचा बचाव?...

Pre Holi Skin Care Tips : होळीच्या रंगांपासून कसा कराल त्वचेचा बचाव? फॉलो करा या 7 टिप्स

Subscribe

प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेला ‘होळी’ हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. जेव्हा लोक एकमेकांना रंग लावून आनंदात हा सण सेलिब्रेट करतात. त्यामुळे सगळा माहोल कलरफुल होऊन जातो. पण रंग खेळताना कोण कुठला रंग वापरेल याची खात्री देणे कठीण असते. अशावेळी त्वचेची आणि केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. या रंगांमधील रासायनिक द्रव्ये आणि त्यात उष्णता यामुळे त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. परिणामी त्वचा निस्तेज होणे, पुरळ येणे, रॅशेस येणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून त्वचेच्या बचावासाठी स्किन केअर टिप्स फॉलो करा. (Pre Holi Skin Care Routine Tips To Protect Your Skin Health) या टिप्स कोणत्या ते जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

1. त्वचा हायड्रेटेड ठेवणे

होळीच्या दिवसांमध्ये गरमीचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. परिणामी त्वचेचे फार नुकसान होते. म्हणून, या दिवसांत आपल्या आहारामध्ये हेल्दी पेयांचा समावेश करा. पाण्याची मात्रा अधिक असणारी फळे खा. यामुळे घामावाटे शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पाण्याची मात्रा संतुलित राखता येते. तुमची त्वचा हायड्रेटेड असल्यास होळीच्या रंगांमुळे त्वचा खडबडीत होण्याची शक्यता कमी होते.

2. थंड पाण्याने चेहरा धुणे

जर तुम्ही ओपन पोअर्सच्या समस्येने त्रस्त असाल तर रंग खेळतेवेळी तुमच्या त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. रंग खेळल्याने तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेच्या लेयर्समध्ये इंफेक्शन होण्याची शक्यता असते. याशिवाय मुरुमांचा धोकाही वाढतो. अशा परिस्थितीत, ओपन पोअर्स बंद करण्यासाठी तुमचा चेहरा नियमित थंड पाण्याने धुणे किंवा चेहऱ्यावर बर्फ चोळणे फायद्याचे ठरेल.

3. बदामाचे तेल वापरा

फ्री रॅडिकल्स आणि हानिकारक रसायनांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी त्यावर प्रोटेक्टिव्ह लेयर असणे गरजेचे असते. यासाठी तुम्हाला बदामाचे तेल मदत करेल. बदाम तेल ‘व्हिटॅमिन ई’ने समृद्ध असते. त्यामुळे रंग खेळण्याआधी काही दिवस चेहऱ्यावर बदाम ऑईलने मसाज करा. शिवाय रंग खेळायला जाताना खोबरेल तेलात बदामाचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावर रंग चिकटण्याचा धोका कमी होतो आणि चेहऱ्याचे तेज कायम राहते.

4. त्वचेवर पेट्रोलियम जेली लावा

चेहऱ्यावर पेट्रोलियम जेली लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते. शिवाय त्वचेवर रंगांचा प्रभाव कमी होतो. परिणामी त्वचेची होणारी जळजळ कमी होते आणि आराम मिळतो. रंग खेळण्याआधी पेट्रोलियम जेलीचा वापर केल्यास ओठ, मान, कान आणि डोळ्यांखालील त्वचेचे संरक्षण होते.

5. फुल स्लीव्हचे कपडे घाला

रंग खेळण्यासाठी फुल स्लीव्हचे कपडे परिधान करा. शिवाय ओढणी किंवा स्कार्फने केस झाकून घ्या. यामुळे शरीराचा बराच भाग रंगाच्या संपर्कात येणार नाही. ज्यामुळे रसायनांच्या प्रभावाने त्वचा कोरडी होण्याची शक्यता कमी होते.

6. स्किन टाइपनुसार सनस्क्रीन निवडा

होळीच्या दिवसात कडक उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी नियमितपणे सनस्क्रीन वापरा. यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो. शिवाय रंग खेळण्याआधी सनस्क्रीन लावल्यास एकतर उन्हापासून संरक्षण होईल आणि दुसरे म्हणजे त्वचेवर रंग टिकणार नाही. मुख्य बाब अशी की, तुम्ही वापरत असलेले सनस्क्रीन हे तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार असायला हवे. तरच उन्हापासून आणि रंगामुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळता येईल.

7. ऑर्गेनिक कलरचा वापर करा 

रंग खेळताना ऑर्गेनिक आणि केमिकल फ्री कलर वापरल्यास रॅशेस येणे, खाज येणे अशा समस्यांपासून बचाव होतो. शिवाय हे रंग केमिकलयुक्त रंगासारखे त्वचेवर फार काळ टिकत नाहीत. ज्यामुळे त्वचा खडबडीत होणे किंवा चेहऱ्यावर खड्डे पडणे अशा समस्या उदभवत नाहीत.

हेही पहा –

Eye Care : ब्लॅक सर्कल्सपासून सुटका देतील होममेड आय मास्क

Manini