Friday, April 19, 2024
घरमानिनीआई बनण्याचे योग्य वय काय असावे?

आई बनण्याचे योग्य वय काय असावे?

Subscribe

चंदा मांडवकर :

आई होण्याचा अनुभव हा अत्यंत सुंदर असतो. या काळात महिलेचा एक नवा प्रवास सुरु होतेच पण पार्टनरसाठी सुद्धा हा क्षण अतिशय आनंदाचा असतो. बाळं जन्माला घालण्याचा हा निर्णय मात्र आयुष्यातील महत्वाच्या निर्णयापैकी एक असतो. त्यामुळे तो सर्व गोष्टींचा विचार करुन घेणे फार गरजेचे असते. कारण त्याचा परिणाम होणाऱ्या बाळावर ही होतो.

- Advertisement -

अशातच तुम्ही आर्थिक सक्षम नसाल, आयुष्यात स्थिर नसाल, वय वाढत असेल किंवा आरोग्या संबंधित एखादी समस्या असेल तर त्यावर काही मार्ग काढा आणि हा निर्णय विचार करुन घ्या. परंतु बहुतांश महिलांना असा प्रश्न पडतो की, आई होण्याचे नक्की वय काय असावे? जेणेकरुन बाळासह आईचा सुद्धा योग्य शारिरीक, मानसिकरित्या विकास होईल. तर याच बद्दल आपण जाणून घेऊयात.

आई होण्याचे योग्य वय काय असावे?

- Advertisement -

प्रेग्नंट राहण्याची योग्य वय | best age for woman to conceive - right age for pregnancy

जसे जसे तुम्ही वयाने मोठे होता तेव्हा तुमची प्रजनन क्षमता स्वाभाविक रुपात कमी होऊ लागते. त्यामुळे प्रेग्नंसीसाठी समस्या उद्भवू शकते. त्याचसोबत अधिक वय असेल आणि प्रग्नेंट राहिल्यास तर प्रेग्नंसीवेळी ही जोखिम निर्माण होऊ शकते. अशातच तज्ञ असा सल्ला देतात की, वयाच्या २० व्या वर्षाच्या अखेरीस किंवा ३० व्या वयाच्या सुरुवाती दरम्यान. हे वय तुमच्या आणि बाळासाठी योग्य असल्याचे सांगितले जाते. एका अभ्यासात यापूर्वी बाळाला जन्म देण्याचे योग्य वय हे ३०.५ वर्ष सांगितली गेली आहे.

प्रजनन क्षमतेला वय कसे प्रभावित करते? महिला या अंडाशयांसोबत जन्म घेतात, ज्याची त्यांना पुढे जाऊन खुप गरज भासते. जवळजवळ २ मिलियन. परंतु जसे वय वाढते तसे अंडाशय हळूहळू कमी होत जातात. वयाच्या ३७ व्या वर्षापर्यंत तुमच्याकडे जवळजवळ २५ हजार तर ५१ व्या वर्षी १ हजार अंडाशय राहू शकता.

याचसोबत एंडोमेट्रियोसिस आणि ट्युबल रोग सारखी प्रजनन क्षमतेला प्रभावित करणारी स्थिती तुमच्यासाटी वाढत्या वयासह जोखिम निर्माण करु शकते. यामुळे तुमची प्रजनन क्षमता वयाच्या ३२ व्या वर्षातच हळूहळू कमी होऊ लागले. ३५-३७ वयादरम्यान, प्रजनन क्षमता अधिक वेगाने कमी होऊ लागते. ,

त्यामुळे बहुतांश वेळा बोलले ही जाते की, जसे तुमचे वय वाढते त्यानुसार प्रग्नेंट होण्याची शक्यता ही कमी होऊ लागते. तीन महिन्याचा प्रयत्नानंतर तुमच्या पुढील मासिक पाळी दरम्यान तुमची प्रेग्नेंट होण्याची शक्यता पुढीलप्रमाणे:

प्रेग्नेंसी दरम्यान सेक्स करणे सुरक्षित आहे का? | रिलेशनशीप News in Marathi

  • २५ वर्षात १८ टक्के
  • ३० वर्षात १६ टक्के
  • ३५ वर्षात १२ टक्के
  • ४० वर्षात केवळ ७ टक्के

अन्य काही कारणे ज्यामुळे प्रेग्नेंट होण्याची शक्यता कमी असते -धम्रपान -कीमोथेरेपी आणि कॅन्सर उपचार -पॅल्विक संक्रमण

योग्य वयात आई झाल्यास…

काही महिला शारिरीक आणि मानसिक रुपात आई बनण्यासाठी तयार असतात. परंतु आर्थिक आणि भावनात्मक रुपात त्या बाळासाठी निर्णय घेऊ शकत नाहीत. अशातच त्यांना आई बनवण्यासाठी काही काळ थांबावे लागते. दरम्यान, अशा स्थितीत महिलांनी हे लक्षात ठेवावे की एका वयांतर प्रेग्नेंट होण्याची शक्यता कमी होते.

वयाच्या ५१ व्या वर्षानंतर शरिराती हार्मोन्स कमी होऊ लागतात. त्यामुळे या वयापूर्वीच कंसीव करावे.

कंसीव करण्यासाठी काही टीप्स

natural remedies to get pregnant fast, योग्य वयात सुरक्षित प्रेग्नेंसी हवी असल्यास प्रत्येक महिलेने द्यावे 'या' गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष! - tips for getting ...

  • आई बनण्यासाठी सर्वात प्रथम तुमचे संतुलित वजन असावे.
  • प्रेग्नेंट होण्यासाठी तुमच्या शरिराचे बॉडी मास इंडेक्स १९-२४ दरम्यान असावे. अधिक वजन किंवा कमी वजन असेल तर त्याचा परिणाम ओवुल्युशनवर पडू शकतो.
  • जर तुम्हाला आई बनायचे असेल तर तुम्हाला असलेल्या काही सवयी जसे धुम्रपान, मद्यपान अशा काही गोष्टी बंद कराव्या लागतील. यामुळे तुमच्या अंडाशयाला नुकसान पोहचू शकतेच. पण प्रग्रेनंट होण्याची शक्यता ही कमी होते.
  • डाएटकडे लक्ष देणे, कॅफेनचे सेवन कमी करावे. अन्यथा प्रेग्नेंसीमध्ये समस्या येऊ शकतात आणि भ्रुणाच्या विकासात काही अडथळे ही निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा :

मुलींचे लग्न करण्यासाठी योग्य वय काय असावे?

- Advertisment -

Manini