Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 250 ग्रॅम इडली रवा
- एक वाटी दही
- एक ग्लास पाणी
- चवीनुसार मीठ
- ईनो
- एक टेबलस्पून तेल
Directions
- सर्वप्रथम दही फेटून घ्या.
- त्यानंतर एका भांड्यामध्ये रवा घालून त्यामध्ये दही घालून मिक्स करून घ्या.
- त्यात पाणी आणि मीठ घालून मिश्रण नीट फेटून घ्या.
- आता हे मिश्रण २० मिनिटे ठेवा.
- २० मिनिटानंतर सोडा घालून मिश्रण नीट फेटून घ्या चांगले मिक्स करून घ्या.
- मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करू नका.
- कुकरमध्ये २ लहान ग्लास पाणी टाकून गॅसवर ठेवा आणि पाणी गरम होऊ द्या.
- इडली स्टँडला थोडे तेल लावून ग्रीस करा.
- आत तयार केले मिश्रण इडलीच्या पात्रात भरा
- आता कुकर लावून १५ ते २० मिनिटांनी कुकरचे झाकण उघडा आणि थंड झाल्यावर इडल्या बाहेर काढा