Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीHealthआहारात कच्ची हळद की हळद पावडर वापरावी ?

आहारात कच्ची हळद की हळद पावडर वापरावी ?

Subscribe

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये हळदीचा वापर पूर्वापार होत आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर ठरते. किचनमध्ये सहज उपलब्ध होणारा हा साधा मसाला तुमचे एकंदर आरोग्य ब-याच प्रमाणात सुधारू शकतो. हळदीमुळे पदार्थाला रंग तर येतोच पण त्याचबरोबर पदार्थांची चवही वाढते. तसेच हळद औषधीही आहे. यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. पण तुम्हाला माहित आहे का की औषधीगुणाने संपन्न असलेली हळद पावडरच्या स्वरुपात आहारात सामविष्ट करावी की कच्च्या हळदीच्या स्वरुपात? ते समजून घेऊया.

आपल्याकडे अन्नपदार्थांमध्ये थेट हळद पावडर वापरली जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की कच्ची हळद तुमच्या आरोग्यासाठी हळदीच्या पावडरपेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकते. आयुर्वेदानुसार कच्ची हळद आणि हळद पावडरमध्ये कच्च्या हळदीचा आहारात समावेश करणे योग्य आहे.

कच्च्या हळदीमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह पोषक तत्वांचा समावेश असतो. हळद पावडर बनवल्याने हळदीमध्ये आढळणाऱ्या काही पौष्टिक घटकांचा प्रभाव कमी होऊ शकतो. यामुळेच हळदीच्या पावडरचे पोषक मूल्य कच्च्या हळदीच्या पौष्टिक मूल्यापेक्षा कमी होतात. त्यामुळे आहारात शक्यतो कच्च्या हळदीचा समावेश करावा.

कच्च्या हळदीचा सुगंध आणि चव दोन्ही हळदीच्या पावडरपेक्षा अधिक प्रभावी असतात.

त्यामुळे हळद पावडरपेक्षा कच्ची हळद कमी प्रमाणात वापरता येते.

याशिवाय कच्च्या हळदीमध्ये कर्क्यूमिनचे प्रमाणही जास्त प्रमाणात आढळते.

उच्च कर्क्यूमिन सामग्रीमुळे, कच्च्या हळदीत दाहक-विरोधी आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असते.

Manini