वास्तुशास्त्रानुसार, घरात सुख-समृद्धी नांदण्यासाठी सकारात्मक ऊर्जा महत्त्वाची भूमिका निभावते. पण काहीवेळा कळत-नकळत घरातील वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात. ज्यामुळे घरात दारिद्र्य प्रवेश करते आणि आर्थिक अडचणी सुरू होतात. अनेकवेळा यामागे तुमच्या काही चुकीच्या सवयी असू शकतात. आजच्या या लेखात जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे घरात दारिद्र्य येते
- घराच्या द्वारासमोर काही झाडे लावणे शुभ मानले जाते. पण, चुकूनही सुकलेली झाडे दारासमोर ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि गरिबी येऊ शकते. घरात सकारात्मकता आणण्यासाठी तुम्ही तुळशीचे रोप नक्कीच लावू शकता.
- घरातील स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान आहे. त्यामुळे या रुमची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही जर अस्वच्छ भांडी घरात ठेवलीत किंवा रात्रीच्यावेळी घाणेरडी भांडी न धुता सिंकमध्ये ठेवलीत तर यामुळे आर्थिक समस्या सुरू होतात. रात्री झोपण्यापूर्वी वास्तूशास्त्रानुसार किचन स्वच्छ करूनच झोपावे.
- कधीकधी पैशांची किंमत न केल्यास दारिद्र्य येते. काहींना पैसे आले की, कुठेही आणि कसेही ठेवायची सवय असते. पण, अशाने लक्ष्मी देवीचा अनादर होतो. त्यामुळे पैसै निश्चित ठिकाणी ठेवावेत. जसे की, तिजोरीत किंवा कपाटात योग्य दिशेला ठेवू शकता.
- अनेकजणांना सायंकाळ झाली की, घर स्वच्छ करायची सवय असते. पण, वास्तूशास्त्रानुसार, सुर्यास्तानंतर घर स्वच्छ करणे टाळायला हवे. संध्याकाळी घर झाडल्यावर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आर्थिक चणचणी सुरू होतात.
- बऱ्याच जणांना साफसफाई केल्यानंतर मुख्य दरवाज्याबाहेर मॉपचे पाणी फेकायची सवय असते. पण, वास्तुनुसार ही मोठी चूक मानली जाते. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात दारिद्र्य येण्यास सुरूवात होते.
- ईशान्य कोपऱ्याला पवित्र स्थान मानले जाते. या दिशेला देवांचे वास्तव्य आहे असे म्हणतात. त्यामुळे या दिशेला स्वच्छता राखावी. कोणत्याही प्रकारची अडचण ठेवू नये. इतकंच काय या दिशेला कचरा गोळा करू नये, असे वास्तुशास्त्र सांगते.
- बऱ्याचजणांना घरात निरोपयोगी वस्तू गोळा करण्याची सवय असते. यात कित्येकदा फाटलेले कपडे, बंद पडलेल्या इलेक्ट्रोनिक वस्तू, रद्दी साठवायची सवय असते. पण, वास्तुशास्त्रानुसार घरातील निरोपयोगी वस्तू घरात गरिबी आणू शकतात. ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
हेही पाहा –