Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीRecipeBalushahi Recipe : बालुशाही

Balushahi Recipe : बालुशाही

Subscribe

सणसमारंभांच्या दिवशी बालुशाही अत्यंत आवडीने खाल्ली जाते. ही मिठाई सर्वच वयोगटातल्या माणसांना फार आवडते. ही मिठाई बनवण्यासाठी माव्याचा उपयोग केला जात नाही. घरात जर एखादा समारंभ असेल तर तुम्ही अगदी सहज हा पदार्थ घरच्या घरी बनवू शकता.

Prepare time: 10 min
Cook: 25 min
Ready in: 35 min

Ingredients

  • मैदा - 1/2 किलो
  • दही - 1/2 कप
  • शुद्ध तूप- 3/4 कप
  • साखर - 3 कप
  • बेकिंग सोडा - 1/2 छोटा चमचा
  • तूप - तळण्यासाठी

Directions

  1. एका मोठ्या भांड्यात मैदा घ्या आणि त्यामध्ये बेकिंग सोडा, दही व 1 मोठा चमचा तूप टाका.
  2. सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या. यानंतर कोमट पाणी हळूहळू मैद्यात टाका व कणकेप्रमाणे मळून घ्या.
  3. लक्षात ठेवा की कणीक जास्त मळायची नाही. केवळ पीठ एकत्र करून 20 मिनिटांकरता बाजूला ठेवा.
  4. काही वेळानंतर कणीक घेऊन त्याला हलक्या हाताने मळत त्याच्या मध्यम आकाराच्या लंबगोल गुंडाळ्या तयार करा.
  5. त्या गुंडाळ्यांना गोल करत पेढ्याचा आकार द्या व त्यांच्या मध्यभागी एक छोटासा खड्डा तयार करा.
  6. सर्व कणकेच्या गोळ्यांचे असे पेढे तयार करून घ्या.
  7. आता एका भांड्यात 2 कप पाणी आणि साखर टाकून मध्यम आचेवर गरम करा.
  8. जेव्हा हे एकत्र होऊन त्याचा पाक तयार होईल तेव्हा गॅस बंद करा.
  9. एका कढईत शुद्ध तूप घेऊन गरम करा. गरम झाल्यावर त्यात कणकेचे तयार केलेले पेढे मध्यम आचेवर तळून घ्या.
  10. पेढे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. यानंतर त्यांना साखरेच्या पाकात साधारण 5 मिनिटांसाठी बुडवून ठेवा.
  11. अशाप्रकारे स्वादिष्ट बालुशाही तयार आहे. तुम्ही याला 2-3 आठवड्यांकरता स्टोअर करुन ठेवू शकता.

Manini