Prepare time: 5 min
Cook: 30 min
Ready in: 35 min
Ingredients
- 1 वाटी काजू
- 1 वाटी बदाम
- 1/2 वाटी पिस्ता
- 1/2 अक्रोड
- 1/2 वाटी खजूर (बिया काढून, बारीक केलेले)
- 1/4 वाटी अंजीर (बारीक केलेले)
- 1/4 मनुका
- 1/4 कप सुंठ पावडर
- 2-3 चमचे तूप
Directions
- काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड हलकं तव्यावर भाजून घ्या. नंतर हे सर्व मिक्सरमध्ये एकत्र करून त्याची बारीक पूड तयार करा.
- खजूर आणि अंजीर बारीक करून घ्या. हे लाडूमध्ये गोडवा आणतात. त्यामुळे साखर किंवा गूळ घालायची गरज नाही.
- तयार केलेल्या पूडमध्ये खजूर आणि सुंठ पावडर घाला. (सुंठ पावडर लाडूंना विशेष चव देते.)
- एका कढईत तूप गरम करा आणि त्यात बारीक केलेलं ड्रायफ्रूट्स मिश्रण, खजूर, अंजीर आणि इतर साहित्य घाला. तसेच तयार केलेली पूड देखील घाला.
- सगळं नीट मिक्स करा आणि 2-3 मिनिटं परतून घ्या.
- मिश्रण गरम असतानाच लहान लहान लाडू वळा. लाडू पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.