Prepare time: 5 min
Cook: 15 min
Ready in: 20 min
Ingredients
- 2 पिकलेली केळी
- 1/2 कप पिठीसाखर
- 1 कप तांदूळ पीठ
- 1 चमचा
- 2 चमचे दूध पावडर
- 1 छोटा चमचा दालचिनी पावडर
- 1/2 चमचा बेकिंग पावडर
- तेल तळण्यासाठी
Directions
- केळी सोलून घ्या व त्यांना एका बाऊलमध्ये कुस्करुन घ्या.
- त्यानंतर त्यात पिठीसाखर घालून चमच्याच्या सहाय्याने मिश्रण एकजीव करा.
- यामध्ये तांदूळ पीठ, दूध पावडर, दालचिनी पावडर आणि बेकिंग पावडर घालून पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करा.
- नंतर या मिश्रणाचे छोटे छोटे लिंबाच्या आकाराइतके गोळे तयार करा.
- कढईत तेल तापत ठेवा. आणि हळूहळू तयार गोळे तापलेल्या तेलात सोडा.
- मध्यम आचेवर हे गोळे थोडे सोनेरी-तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
- कोलार बोरा अर्थात केळ्याची बोरं तयार आहेत.
- आणखी गोडपणासाठी आणि सजावटीसाठी तुम्ही ही बोरं पिठीसाखरेत घोळवू शकता किंवा बोरांवर पिठीसाखर टाकू शकता.
- गरमागरम बोरं चहासोबतही तुम्ही सर्व्ह करु शकता.