Prepare time: 15 min
Cook: 25 - 30 min
Ready in: 45 min
Ingredients
- पिकलेली केळी - 3 ते 4
- मैदा - 1 कप
- साखर - अर्धा कप
- तूप
- बेकिंग पावडर
- बेकिंग सोडा - 1/2 चमचा
- दालचिनी पूड
- मीठ
- दूध
- काजू-बदामाचे तुकडे
Directions
- एका बाऊलमध्ये केळी स्मॅश करून घ्यावीत.
- स्मॅश केलेल्या केळ्यात तूप आणि साखर मिक्स करून घ्यावी.
- दुसरीकडे एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, दालचिनी पूड एकत्र करून घ्यावी.
- यानंतर स्मॅश केलेल्या केळ्याचे मिश्रण मैद्याच्या मिश्रणात मिक्स करावी.
- मिश्रण जर जास्तच घट्ट असेल तर थोडे दूध घालावे.
- यानंतर ओव्हन 180 डिग्रीवर गरम करून घ्यावे.
- मफिन्सच्या साच्याला तूप लावून घ्यावे आणि त्यात मफिन्सचे मिश्रण टाकावे.
- मिश्रणात काजू-बदामाचे तुकडे टाकण्यास विसरू नये. तुम्ही काजू-बदामाचे तुकड्यांऐवजी चॉकलेटचे तुकडे वापरू शकता.
- ओव्हनमध्ये मफिन्स 20 ते 25 मिनिटे बेक करून घ्यावेत.
- गरमागरम मफिन्स चहासोबत सर्व्ह करावेत.