Sunday, January 12, 2025
HomeमानिनीRecipeRecipe : चमचमीत भरली वांगी

Recipe : चमचमीत भरली वांगी

Subscribe

वांग्यापासून विविध प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. अनेक घरात वांग्याची भाजी आवडीने खाल्ली जाते. तुम्ही वांग्यामध्ये व्हरायटीसाठी भरली वांगी बनवू शकता. जाणून घेऊयात, भरली वांगी तयार करण्याचे साहित्य आणि कृती,

Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 45 min

Ingredients

  • वांगी - 4 ते 5
  • चिरलेला कांदा - 1
  • सुकं खोबरं - अर्धी वाटी
  • पांढरे तीळ -
  • लसणाच्या पाकळ्या - 6 ते 7
  • आल्याचा तुकडा
  • जीरं-मोहरी
  • कडीपत्याची पाने
  • हिंग
  • हळद
  • लाल तिखट
  • शेंगदाणे
  • तेल
  • मीठ

Directions

  1. सर्वात आधी वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत.
  2. यानंतर वाग्यांचे देठ न काढता वांग्याचे काप करून घ्यावेत.
  3. एका भांड्यात पाणी आणि चमचाभर मीठ टाकून वांगी त्यात ठेवावीत.
  4. भरलेल्या वांग्याचा मसाला तयार करण्यासाठी गॅसवर तवा गरम करण्यास ठेवावा.
  5. तवा गरम झाल्यास शेंगदाणे भाजून घ्यावेत. भाजलेल्या शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी.
  6. यानंतर तव्यात चमचाभार तेल टाका. त्यात आलं-लसूण, पांढरे तीळ, किसलेलं खोबरं सोनेरी होईपर्यत भाजून घ्यावे.
  7. मिश्रणात लाल तिखट, हळद, मीठ टाकून सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
  8. तयार मसाला चिरा दिलेल्या वांग्यामध्ये नीट भरून घ्यावी.
  9. आता पुन्हा एका कढईत गॅसवर तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले की, जिरं, मोहरी, कडीपत्याची पाने, हिंग टाकावे.
  10. फोडणीत चिरलेला कांदा गुलाबी गुलाबी होईपर्यत परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाल्यावर भरली वांगी तेलात वाफेवर शिजवून घ्यावीत.
  11. सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर टाकण्यास विसरू नये.
  12. तुमची चमचमीत भरली वांगी गरमागरम भाकरीसोबत सर्व्ह करावीत.
- Advertisment -

Manini