Prepare time: 5 min
Cook: 10 min
Ready in: 20- 25 min
Ingredients
- गाजर - 2 कप
- तांदूळ - 1 ते 2 चमचे
- तूप
- काजू-बदामचे तुकडे
- दूध - अर्धा लिटर
- वेलची पूड
- कंडेन्स मिल्क
Directions
- पॅनमध्ये एक कप तूप गरम करावे. तूप गरम झाल्यावर त्यात काजू-बदामचे तुकडे फ्राय करुन घ्यावेत.
- यानंतर पॅनमध्ये किसेलेलं गाजर 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करुन घ्या.
- फ्राय केल्यावर पॅनमध्ये दूध मिक्स करुन घ्या.
- दूध टाकल्यानंतर मिश्रण सतत ढवळत राहावे, जेणेकरुन मिश्रण पॅनला चिकटणार नाही.
- खीर उकळून जाडसर होत आली की, त्यात गरजेनुसार साखर घालावी.
- साखर पूर्णपणे मिश्रणात वितळवून घ्यावी.
- यानंतर पुन्हा फ्राय केलेल काजू, बदामचे तुकडे , चिमूटभर वेलची पावडर खीरीत मिक्स करावी.
- पुन्हा एकदा सर्व मिश्रण ढवळून घ्यावे आणि 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करावा.
- तयार गरमागरम गाजराची खीर सर्व्ह करण्यास तयार झाली आहे.