Prepare time: 10 min
Cook: 10 min
Ready in: 20 min
Ingredients
- ओलं खोबरं - 2 ते 3 वाटी
- रवा - 3 चमचे
- दूध - 2 वाटी
- काजू-बदाम -
- साखर - 1 वाटी
- वेलची पूड - चिमूटभर
- तूप - 1 चमचा
Directions
- सर्वात आधी पॅन गरम करून त्यात एक चमचा तूप घालावे.
- तूप गरम झाल्यावर त्यात 3 चमचे रवा घालून खरपूस भाजून घ्यावा.
- रवा खरपूस भाजून झाल्यावर त्यात काजू-बदामचे तुकडे घालावेत.
- आता त्यात २ वाटी ओलं खोबरं घालून भाजून घ्यावे.
- खोबंर भाजून झाल्यावर त्यात २ वाटी दूध, 1 वाटी साखर घालावी.
- साखर घातल्यावर मिश्रण चमच्याने सतत ढवळत राहावे.
- सर्वात शेवटी चिमूटभर वेलची पूड घालावी आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- मिश्रण मध्यम आचेवर ठेवून घट्ट होईपर्यत शिजवून घ्यावे.
- अशा प्रकारे झटपट तयार होणारी ओल्या नारळाची खीर खाण्यास तयार झाली आहे.