Sunday, March 16, 2025
HomeमानिनीRecipeRecipe - कुरकुरीत कॉर्न पकोडे ( Corn Pakoda )

Recipe – कुरकुरीत कॉर्न पकोडे ( Corn Pakoda )

Subscribe

संध्याकाळचा नाष्टा करताना चहासोबत काही गरमागरम असेल तर चहा घेण्यास आणखी मज्जा येते. त्यामुळे चहासोबत जर तुम्हाला चटपटीत आणि कुरकुरीत खायचे असेल तर कॉर्न पकोडे हा पर्याय उत्तम राहिल. जाणून घेऊयात, कुरकुरीत कॉर्न पकोडे कसे बनवायचे,

Prepare time: 15 min
Cook: 15 min
Ready in: 30 min

Ingredients

  • ताजे कॉर्न -1 कप
  • बारिक चिरलेला कांदा - 1
  • हिरव्या मिरच्या - 2 ते 3
  • बेसन - 1/4 कप
  • तांदळाचे पीठ - 2 चमचे
  • लाल तिखट
  • हळद पावडर -
  • जिरे
  • हिंग
  • कोथिंबीर
  • तेल

Directions

  1. सर्वात आधी बाऊलमध्ये कॉर्नच्या दाण्यांची मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट बनवून घ्यावी.
  2. यानंतर तयार पेस्टमध्ये कापलेला कांदा, बारिक चिरलेली हिरवी मिरची, जिरे, लाल तिखट, कोथिंबीर, हिंग आणि चवीपूरते मीठ एकत्र करून घ्या.
  3. यानंतर मिश्रणात तांदळाचे पीठ आणि बेसन मिक्स करा.
  4. कढईत तेल गरम करण्यास ठेवा.
  5. तेल गरम झाल्यावर पकोडे तळून घ्या.
  6. पकोडे सर्व बाजूने गोल्डन होईपर्यत तळून झाले की गरमागरम सर्व्ह करा.

Manini