Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीRecipeEgg Cutlet : अंड्याचे कटलेट

Egg Cutlet : अंड्याचे कटलेट

Subscribe

अंडी प्रोटीनयुक्त नाष्टा असल्याने दररोज करण्याचा सल्ला दिला जातो. पण, रोज अंड्याचे ऑमलेट किंवा उकडलेले अंड खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही झटपट तयार होणारे अंड्याचे कटलेट बनवू शकता.

Prepare time: 20 min
Cook: 10 - 15 min
Ready in: 30 min

Ingredients

  • उकडलेली अंडी - 5 ते 6
  • उकडलेले बटाटे 2
  • आले लसूण पेस्ट - 1 चमचा
  • हिरव्या मिरच्या 2 ते 3
  • कांदा - १
  • कोथिंबीर
  • तेल
  • गरम मसाला
  • लाल तिखट
  • ब्रेड क्रम्ब्स

Directions

  1. सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवा.
  2. तेल गरम झाल्यावर कांदा, आले-लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला परतून घ्या. तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या.
  3. उकडलेल्या अंडी किसून घ्या.
  4. यानंतर तयार मिश्रणात उकडलेल्या अंड्याचा किस, बटाटे एकजीव करून घ्यावेत. कोथिंबीर आणि चवीपूरते मीठ मिक्स करा.
  5. आता लहान आकाराचे गोळे तयार करा, यांना थोडे चपटे करून कटलेटच्या आकारात तयार करून घ्या.
  6. तयार कटलेट कच्या अंड्याच्या मिश्रणात घोळवून त्यानंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून तेलात शॅलो फ्राय करा.
  7. तुमचे झटपट तयार होणारे अंड्याचे कटलेट तयार झाले आहेत.

Manini