Prepare time: 1 hr
Cook: 15-20 min
Ready in: 1hr 20 mins
Ingredients
- कोलंबी - 2 वाटी
- तांदूळ - 1 वाटी
- कांदा - 1
- आले लसूण पेस्ट - 1 चमचा
- पुदीन्याची पाने
- लाल तिखट
- हळद
- गरम मसाला
- दही - अर्धा कप
- हिरव्या मिरचीची पेस्ट
- टोमॅटो - 1
- कांदा तळलेला
- तूप
- तेल
Directions
- तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत आणि 1 तास तसेच ठेवून द्या. एका तासानंतर तांदळातील पाणी निथळून काढावे.
- एका भांड्यात तूप गरम करावे आणि थोडे तेलही घालावे. यात सर्व खडे मसाले टाकून घ्या परतवून घ्यावेत.
- यानंतर मिश्रणात तांदूळ टाकून परतवून घ्यावेत. गरजेनुसार पाणी घालावे.
- तांदळामध्ये मीठ टाकून 70% भात शिजवून घ्यावा.
- कोलंबी मॅरीनेट करण्यासाठी कोलंबीमध्ये लाल तिखट, हळद, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, दही आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. सर्व मिश्रण अर्ध्या तासासाठी मॅरीनेट करण्यास ठेवावे.
- दुसरीकडे एका भांड्यात कांदा तांबूस रंगाचा होईपर्यत परतवून घ्यावा. यात आल -लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, टोमॅटो टाकून परतवून घ्यावा.
- तयार मिश्रणात मॅरीनेट केलेली कोलंबी घाला आणि परतवून घ्या. तेल सुटल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर मिक्स करावी. तयार कोलंबी एका बाऊलमध्ये काढून घ्यावी.
- सर्वात शेवटी त्याच भांड्यात कोलंबीचा लेयर लावा आणि त्यावर भाताचा. या पद्धतीने कोलंबी आणि भाताचे लेयर लावून घ्यावेत.
- सर्वात शेवटच्या लेयरवर तळलेला कांदा, पुदीन्याची पाने, तूप टाकून झाकण ठेवा. भांडे जाड तव्यावर 20 मिनिटे मंद आचेवर ठेवा.
- 20 मिनिटांनंतर लज्जतदार कोलंबी बिर्याणी सर्व्ह करावी.