Prepare time: 20 min
Cook: 15-20 min
Ready in: 30 min
Ingredients
- पालक - 1 जुडी
- बेसन - 1 वाटी
- नाचणीचे पीठ - 1 ते 2 चमचे
- तांदळाचे पीठ - 1 ते 2 चमचे
- तिळ - 2 चमचे
- ओवा
- जीरे
- हिरवी मिरची - 5 ते 6
- लसणाच्या पाकळ्या - 5 ते 6
- पाणी
- तेल
- मीठ
Directions
- पालक स्वच्छ करून घ्यावा. पालकातील पाणी निथळले की,बारीक चिरून घ्यावा.
- चिरलेला पालक एका बाऊलमध्ये घ्या. त्यात बेसन, नाचणीपीठ, तांदळाचे पीठ, ओवा, जिरे, लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिळ आणि चवीनुसार मीठ घालावे.
- तयार मिश्रणात पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करून घ्या.
- सर्वात शेवटी मिश्रणाला 1 चमचा तेलाचा हात लावा आणि पुन्हा मळून घ्या.
- तयार पीठ एका भांड्याला तेल लावून त्यावर ठेवा.
- यानंतर कुकरमध्ये गरम पाणी घेऊन त्यात स्टॅंड ठेवून मिश्रण असलेले भांडे ठेवा.
- कुकरला 2 ते 3 शिट्या आणाव्यात.
- वड्या शिजल्यावर त्याच्या चौकोनी वड्या कापून घ्याव्यात.
- पालक वडी तेलात तळून घ्या आणि गरमा गरम सर्व्ह कराव्यात.