Prepare time: 10 min
Cook: 30 min
Ready in: 40 min
Ingredients
- बासमती तांदूळ - 2 कप
- साखर - 4 चमचे
- सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ता) - आवडीनुसार
- तूप - 1 चमचा
- केशर काड्या - 7 ते 8
- लहान गुलाब जाम - 16 ते 18
- रबडी - 2 मोठे चमचे
Directions
- सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात तूप गरम करत ठेवा आणि नंतर त्यात सुका मेवा टाकून साधारण एका मिनिटासाठी भाजून घ्या.
- आता यामध्ये साखर , केसर आणि पाणी टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करुन घ्या.
- आता या मिश्रणाचा एकतारी पाक करुन घ्या.
- पाक तयार झाल्यावर यात शिजवलेले तांदूळ म्हणजेच भात घालून घ्या. काही वेळाने या भातामध्ये तयार गुलाबजाम घालून शिजवून घ्या.
- अशाप्रकारे सीताभोग तयार आहे. तुम्ही हा रबडी आणि गुलाबजामने सजवून सर्व्ह करू शकता.