चिकन सँडविच हे आपण सगळ्यांनीच बाहेर खाल्ले असेल. लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत अनेकांना सँडविच चिकन ही डिश खूप आवडते. अशातच आता ही डिश बाहेर न खाता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने होममेड चिकन सँडविच घरच्या घरी अगदी सहजपणे करू शकता. तसेच आता आपण होममेड चिकन सँडविचला काय साहित्य लागणार ते पाहूया…
साहित्य
- 1 कप चिकन, उकडलेले
- 1 टीस्पून मेयोनीस
- 1 टीस्पून काळी मिरी
- 2 ब्रेडचे तुकडे
- 1 शिमला मिरची
- 1 लेट्यूस पाने
कृती
- एका भांड्यात उकडलेले चिकनचे तुकडे वेगळे करा.
- आता मेयोनीस आणि काळी मिरी त्यात घाला. आणि हे मिश्रण चांगले मिसळा.
- यानंतर एक ब्रेड घ्या आणि त्यावर हे मिश्रण नीट लावून घ्या.
- हे झाल्यावर लेट्युसची पाने आणि शिमला मिरची बारीक चिरून घ्या.
- आता ब्रेडला लावलेल्या चिकनच्या मिश्रणावर हे व्हेजिटेबल्सचे मिश्रण लावा.
- वर ब्रेडचा दुसरा स्लाइस ठेवा आणि त्याचे दोन भाग करा.
- आता हे चिकन सँडविच हिरव्या कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.