Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीRecipeMonsoon Recipe : पावसाळ्यात करा अळूचं फदफदं

Monsoon Recipe : पावसाळ्यात करा अळूचं फदफदं

Subscribe

पावसाळयात बहुतेक भाज्या या बाजारात येत असतात. अशातच पावसाळ्यात अळूचं फद-फद घरा-घरात केलं जात. अळूच्याच भाजीला अळूचं फद-फद या नावाने देखील ओळखलं जात. गरमा-गरम अळूचं फद-फद खायला एकदम चविष्ट लागत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने हे शरीरासाठी चांगलं मानलं जात.

साहित्य

7-8 अळुची पाने.
1/2 वाटी चणा डाळ.
1/4 वाटी तुर डाळ.
1.5 टेबलस्पून तांदुळ.
1/4 वाटी शेंगदाणे.
1 चमचा तिखट.
1/4 चमचा हळद.
1/4 चमचा हिंग.
5-6 लसुण कळ्या ठेचुन.
1 गुळाचा खडा.
2 चमचे कोकम आगळ.
1/2 चमचा मोहरी.
1/2 चमचा जीरे.
मीठ (चविनुसार) / तेल (प्रमाणानुसार).
2 चमचे खोवलेले ओले खोबरे.
1 चमचा बेसन.
2 सुक्या लाल मिरच्या.

- Advertisement -

Aluche Fadfade - YouTube

कृती

  • प्रथम अळुची पाने स्वच्छ धुवुन बारीक चिरुन घ्या.
  • यानंतर चणाडाळ,तुरडाळ,तांदुळ,शेंगदाणे अळूच्या पानात घालुन यात थोडी हळद घालुन कुकरमधे चार शिट्या करुन शिजवुन घ्या.
  • आता कुकर गार झाला की हे सगळे रवीने छान घोटुन घ्या.
  • हे झाल्यावर या मधे गुळ,मीठ,कोकम आगळ,(तुम्ही चिंचेचा कोळ ही घालु शकता) बेसन,ओले खोबरे टाकुन छान शिजवुन घ्या.
  • आता पॅन मध्ये तेल गरम करुन त्यात मोहरी,जीरे,ठेचलेला लसुण,हिंग,लाल सुकी मिरची घाला. हळद,तिखट घालुन छान फोडणी घ्या.
  • हि फोडणी भाजीवर घालुन वरुन झाकणी ठेवुन दोन तीन मिनीट भाजीला छान वाफ येउन शिजु द्या. मग गॅस बंद करा.
  • आता आपले अळुचे फदफदं म्हणजेच अळुच्या पानांची पातळ भाजी तयार आहे.
  • मस्त गरम गरम तांदळाच्या भाकरी सोबत हे अळुचे फदफदं सर्व्ह करा.

________________________________________________________________________

- Advertisement -

हेही वाचा :

Monsoon: पावसाळ्यात बनवा ‘हे’ हेल्दी चाट

 

- Advertisment -

Manini