Thursday, January 23, 2025
HomeमानिनीRecipeKitchen Tips : किचनमधील हटके टीप्स

Kitchen Tips : किचनमधील हटके टीप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

Gathering Cooking Tips - Food At Soul Shack - Cooking made easy

  • खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारिक करावे.
  • मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो, त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा. त्यामुळे रंग हिरवागारच राहील.
  • लोण्याला वास येत असेल तर खाण्याच्या सोड्याच्या (सोडा बाय कार्ब) पाण्यातून लोणी धुवून घ्यावे.
  • लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या गड्ड्याला थोडा गोड्या तेलाचा हात लावावा.
  • वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी बेलदोडे थोडे गरम करून घ्यावेत.

Essential Cooking Tips For Beginners

  • लोण्याचे तूप बनवताना ते होत आल्यावर एखादे विड्याचे पान किंवा चिमटभर मीठ घालावे त्यामुळे तूप रवाळ होते.
  • मूळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते टाकून न देता आमटीला घालावे स्वाद चांगला येतो.
  • किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा गूळ चिकटत नाही.
  • गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळीबाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात.

 

 


हेही वाचा :

Kitchen Tips : गृहिणींसाठी खास 10 किचन टिप्स

Manini