Friday, January 17, 2025
HomeमानिनीRecipeMicrowave Side Effects : मायक्रोवेव्हमध्ये 'हे' पदार्थ कधीच करू नका गरम

Microwave Side Effects : मायक्रोवेव्हमध्ये ‘हे’ पदार्थ कधीच करू नका गरम

Subscribe

आपण अनेक पदार्थ गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर करतो. पण सर्वच पदार्थ मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये गरम करणं शरीरासाठी उपयोगी नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात गरजेपेक्षा थोड जास्त अन्न शिजवलं जातं. कोणालाही जास्त भूक लागली किंवा पाहुणे आले तर त्यांना पोटभर जेवता यावं यासाठी हा खटाटोप असतो. मात्र उरलेलं हे अन्न खाण्यापूर्वी लोकं ते गरम करून खाण्यास प्राधान्य देतात. काही जण गॅसवर तर काही लोकं मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करतात. मायक्रोवेव्हमुळे अनेक लोकांचं काम सोपं झालयं यात काहीच शंका नाही. पण काही लोक उठसूठ कोणतेही पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये गरम करतात. ज्यामुळे शरीराचे नुकसान होवू शकते.

अशातच मायक्रोवेव्हमध्ये काही खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांची चव आणि पौष्टिक मूल्य खराब होऊ शकते. मायक्रोवेव्हमध्ये आपण कोणते पदार्थ गरम करू शकतो आणि कोणते पदार्थ गरम करणे योग्य नाही, हे आपल्याला माहित असले पाहिजे. आज आशचा काही पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे टाळले पाहिजे.

What You Can and Can't Put in a Microwave | Whirlpool

तांदूळ

भातामध्ये बॅसिलस सेरियसचे नावाचा एक घटक असतो. ज्यामुळे अन्नात विषबाधा होऊ शकते. अशातच शिजवलेला भात जितका जास्त काळ टिकतो ,तितकाच तो जिवाणू वाढण्याची शक्यता तयार करत असतो. 24 तासांपेक्षा भात जर जुना असेल तर मायक्रोवेव्हमध्ये भात गरम करू नका. अन्यथा याचे परिणाम शरीरावर लगेच दिसून येतात. तसेच हा भात शरीरासाठी हानिकारक आहे.

अंड्याचे पदार्थ

अंड्याचे पदार्थ कधीच मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नयेत. अंड्याची एखादी डिश बनवली तर ती लगेचच खावी किंवा परत गरम केली तर थोडं गार करून खावी.

हिरव्या पालेभाज्या

पालक, साग, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये नायट्रेट असते. ओव्हनमध्ये हिरव्या भाज्या गरम केल्यावर त्यात असलेले नायट्रेट हानिकारक बनते, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते.

फ्रेंच फ्राईज आणि तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थ किंवा फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करण्याची चूक करत असाल तर आजपासून असे बिलकूल असे करू नका. कारण फ्रेंच फ्राईज मायक्रोवेव्हमध्ये गरम केल्यास त्यांची कुरकुरीतपणा कमी होऊ शकतो आणि त्यांची चव देखील बदलू शकते.

मांस

बहुतेक लोकांना मांस गरम असताना खायला आवडतं, जरी ते शिळे झाले असले तरीही बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये ते गरम करून खाण्याची चूक करतात. पण असे करू नये. कारण ओव्हनमध्ये मांस गरम केल्याने त्याची चव खराब होऊ शकते. ते मायक्रोवेव्हमध्ये गरम करण्याऐवजी तुम्ही ग्रिलवर किंवा पॅनमध्ये तळू शकता.


हेही वाचा :

पावसाळ्यात कणीक फ्रिज मध्ये ठेवणे आहे धोकादायक

Manini