वर्किंग वूमनचे सकाळचे शेड्युल हे फार बिझी असते. अशावेळी अनेक महिला या सकाळच्या नाश्त्यासाठी वेळ काढू शकत नाही किंवा त्या विसरून तरी जातात. मात्र, सतत असे होऊ लागल्यास आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
अनेक नोकरी करणाऱ्या महिलांना हल्ली अशक्तपणाच्या किंवा रक्त कमी असण्याच्या समस्या जाणवत आहेत. यासोबत थकवा जाणवणे, वजन न वाढणे यादेखील समस्या भेडसावत आहेत. याचे मुख्य कारण कुठेतरी सकाळचा नाश्ता न करणे हे ठरत आहे. त्यामुळे आज आपण अशा काही ब्रेकफास्टच्या टिप्स पाहणार आहोत ज्याने तुम्ही सकाळी उपाशीपोटी घरातून बाहेर निघणार नाही.
दूध आणि केळी
सर्वात कमी मेहनतीचा नाश्ता म्हणजे दूध आणि केळी कारण हा करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ आणि मेहनत लागणार नाही. घराघरात असणारे हे दोन पदार्थ आहेत. सकाळच्या धावपळीच्या वेळेत ह्या दोन गोष्टी तुम्ही सहजपणे खाऊ शकता. एक ग्लासभर दूध आणि एक केळ खाऊन तुम्ही घराबाहेर निघालात तर तुमचा नाश्ताही होईल आणि पोटही भरलेले राहील.
सँडविच
काही वेळेतच तयार होणारे सँडविच हा देखील ऑप्शन सकाळच्या ब्रेकफास्टसाठी बेस्ट आहे. यासाठी तुम्हाला एक कांदा, एक टोमॅटो, हवी असल्यास काकडी यांचे तुकडे कापून घ्यायचे आहेत. यानंतर ब्रेडला चीज किंवा बटर लावून दोन्ही ब्रेड्समध्ये कापलेले तुकडे ठेवायचे आहेत. नंतर तयार सँडविच तुम्हाला तव्यावर गरम करून घ्यायचे आहे किंवा जर तुमच्याकडे टोस्टर असेल तर त्यातसुद्धा गरम करू शकता. हे हेल्दी सँडविच तुम्ही कुठेही खाऊ शकता.
दुधात कॉर्नफेल्क्स
रोज सकाळी नाश्ता करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दुधात कॉर्नफ्लेक्स खाऊ शकता. हे प्रोटिन्सनी भरलेले असून ह्याने शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. शिवाय हल्ली कॉर्नफ्लेक्समध्ये विविध फ्लेव्हर्स देखील मार्केटमध्ये येऊ लागलेत. आवडीनुसार सकाळी तुम्ही ते खाऊ शकता.
पोहे
महाराष्ट्रीयन नाश्ता म्हणून ओळखला जाणारे पोहे हे देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. सकाळच्या नाश्त्यात पोहे खाल्याने पोट भरलेले राहते. हा नाश्ता करून तुम्ही ऑफिसला गेलात तर जेवणाच्या वेळेपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही. शिवाय पोहे हे आरोग्यदायी असून त्यांना बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही.
ओट्स
ओट्सचे अनेक प्रकार हे बाजारात येऊ लागलेत. सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्स हा देखील उत्तम ऑप्शन आहे. केवळ ५ मिनिटात तयार होणारे ओट्स तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी खाऊ शकता. याने तुमचे पोट भरलेले राहील.
हेही वाचा ; लाकडी चमचे कसे स्वच्छ करावेत ?