हल्ली आपल्यापैकी बहुतेकांना प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करणे आवडते. कारण कुकरमधले अन्न पटकन शिजते तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारचा खास वेळ द्यावा लागत नाही. महत्वाचे म्हणजे कुकर एकदा लावला की त्याला सारखे बघावे लागत नाही. कोणत्याही त्रासाशिवाय पटकन अन्न तयार करण्यात मदत होते. अशातच ज्यांना स्वयंपाक करताना नेहमी उशीर होतो त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
अशातच प्रेशर कुकरमध्ये स्वयंपाक करणे हा खरोखरच घाईचा विषय नाही. तर स्वयंपाक होणार हा एकमेव पर्याय आहे. तसेच प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ तयार केल्याने होणार्या दुष्परिणामांबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. त्याबद्दल अधिक माहिती आता आपण जाणून घेऊया.
प्रेशर कुकरमध्ये अन्न तयार केल्याने होणाऱ्या हानिकारक परिणामांवर बरेच वाद पुढे आले आहेत. तसेच बरेच सिद्धांत असे सुचवतात की, प्रेशर कुकरमध्ये काही पदार्थ तयार केल्याने शिजवलेल्या अन्नातील पोषक द्रव्ये नष्ट होतात आणि ते बेचव लागतात.
बर्याच तज्ञांच्या मते, प्रेशर कुकरमध्ये स्टार्च युक्त अन्न तयार करणे आपल्या आरोग्यासाठी हे हानिकारक असू शकते. याचे कारण असे की जेव्हा स्टार्चयुक्त अन्न कुकरमध्ये तयार केले जाते. तेव्हा तुम्ही कुकर किंवा तुमचे जेवण किंवा ते दोन्ही खराब करू शकता. अशातच कूकरमधल्या या अन्नाचे अधिक सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून, काही खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही कधीही प्रेशर कुकरमध्ये तयार करू नये.
- ‘तांदूळ’ हा प्रेशर कुकरमध्ये बनवलेल्या खाद्यपदार्थांपैकी एक आहे पण तो हानिकारक आहे.
- असे मानले जाते की प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्याने हानिकारक केमिकल तयार होते ज्यामुळे अनेक रोग होऊ शकतात.
- तसेच प्रेशर कुकरमध्ये तयार केलेला भात खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.
- प्रेशर कुकरमध्ये तांदूळ शिजवताना तुम्ही तांदळातील पाणी काढून टाकत नाही आणि त्यामुळे तुमचे वजन वाढते.
- यामुळे जमल्यास टोपात भट शिजवा तसेच कुकर मध्ये भट शिजवणे टाळा.
- तांदळातले पाणी कुकरमध्ये तसेच राहते ज्यामुळे शरीरात भात पचण्यास कठीण जाते.
________________________________________________________________________
हेही वाचा :
Bachelor आहात मग तुमच्या किचन मध्ये ‘या’ वस्तू हव्याचं