Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipमुलांना शाळेत Admission घेण्याआधी 'या' गोष्टी तपासा

मुलांना शाळेत Admission घेण्याआधी ‘या’ गोष्टी तपासा

Subscribe

जून महिना सुरू झाला आहे. आता सर्व पालक आपल्या मुलांना शाळेत (School) पाठवण्याच्या तयारीला लगले आहेत. मुलांना (Children) शाळेत पाठविताना पालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते. नवीन शाळेत (New School) मुलांना एडजस्ट करणे हे पालकांसाठी जून एक मोठा टास्क असतो. मुले शाळेत जायला लागली की, पालकांनाही खूप संघर्ष करावा लागतो.

मुलाचे नवीन शाळेत समायोजन करणे हे पालकांसाठी मोठे काम असते. प्रवेशापूर्वी मुलांबरोबरच पालकांनाही तिथल्या वातावरणाची खूप काळजी असते. अशा परिस्थितीत मुलाला नवीन शाळेत जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. चला तर मग, आपण आज जाणून घेऊ या. मुलांना नवीन शाळेत एडजस्ट करण्यासाठी काय-काय कारवे लागते.

- Advertisement -

नवीन बदलांसाठी मुलाला असे करा तयार

मुलाला शाळेत घेऊन जात असताना, मुलांची शाळेतील कर्मचाऱ्यांशी ओळख करून द्यावी. तुम्‍ही तुमच्‍या मुलासोबत काही वेळ शाळेत घालवता जेणेकरुन त्यांना कंफर्टेबल वाटेल.

- Advertisement -

शाळेच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करा

तुम्ही मुलांना ज्या शाळेत प्रवेश घेणार आहात. त्या सर्व शाळांची एक यादी तयार करा. यानंतर तुम्ही तयार केलेल्या यादीतील शाळेत सुविधा, कर्मचाऱ्यांची पात्रता आणि शाळेला मान्यता असलेल्या गोष्टींची माहिती घ्या. याशिवाय तेथील वातावरणाची माहिती घेण्यासाठी तुम्ही कर्मचाऱ्यांशी बोलू शकता.

शाळेचे वेळापत्रकानुसार मुळांचे शेड्यूल करा

जर मुले नवीन शाळेत शिफ्ट होत असेल तर पालकांनी काही आठवडा भरापूर्वीच मुलाला त्या शाळेच्या वेळापत्रकात शिफ्ट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे मुलासाठी नवीन रुटीन स्वीकारणे सोपे होईल.

कर्मचारी आणि इतर मुलांना जाणून घ्या

तुमच्या मुलाला नवीन शाळेत पाठवण्यापूर्वी येथील कर्मचारी आणि इतर मुलांना भेटण्यासाठी वेळ काढा. हे आपल्या मुलास आरामदायक वाटण्यास आणि नवीन वातावरणाची सवय होण्यास मदत करेल. याशिवाय तेथे शिकणाऱ्या मुलाच्या पालकांशीही संपर्क साधता येईल.


हेही वाचा – Parenting Tips: तुमच्या मुलाला सतत राग येतो? मग अशी घ्या काळजी

- Advertisment -

Manini