Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipलग्नाआधी 'या' 4 गोष्टी नक्की जाणून घ्या, नाहीतर...

लग्नाआधी ‘या’ 4 गोष्टी नक्की जाणून घ्या, नाहीतर…

Subscribe

लग्नाच्या पवित्र नात्याला सात जन्माचे नाते मानले जाते. परंतु काही वेळेस नवरा-बायकोमधील लहानशी चुक, गैरसमज नाते मोडते. त्यामुळेच लग्नाचा निर्णय घेणे म्हणजे आयुष्यातील सर्वाधिक मोठ्या निर्णयांपैकी एक असतो. जेणेकरुन भविष्यात पार्टनरमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये आणि त्यांना आनंदाने आयुष्य जगता येईल. सध्याच्या बदलत्या लाइफस्टाइलमुळे बहुतांश महिला-तरुणी पार्टनरला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. काहीजणी तर पार्टनर सोबत लिव्ह इन रिलेशनशिपचा ही पर्याय निवडतात. परंतु तुम्ही जर लग्न करणार असाल तर पुढील काही गोष्टी नक्कीच लग्नापूर्वी जाणून घेतल्या पाहिजेत.

-एकमेकांचा सन्मान करा
कोणतेही नाते मजबूत करण्यासाठी एकमेकांचा सन्मान करणे फार महत्वाचे असते. लग्नासारख्या नात्यात असताना तुम्ही पार्टरनचा सन्मान केलाच पाहिजे. लग्नाचे नाते अधिक घट्ट बनवण्यासाठी हे दोन्ही पार्टनरने एकमेकांसोबत केलेच पाहिजे.

- Advertisement -

-सहमतीने लग्न करा
जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटता तेव्हा बहुतांश गोष्टींची अपेक्षा केली जाते. अशातच काही गोष्टी विचाराव्यात का की नाही यामुळे कंफ्युजन होते. त्यामुळे लग्नापूर्वीच पार्टनरला तो या लग्नासाठी खरंच सहमत आहे का हे विचारा. अन्यथा पुढे जाऊन समस्या येऊ शकतात.

-पार्टनरच्या नातेवाईकांबद्दल जाणून घ्या
आपले वैवाहिक आयुष्य आनंदित घालवण्यासाठी पार्टनरच्या मित्रपरिवार, नातेवाईकांबद्दल जाणून घ्या. त्याचसोबत त्याच्या एक्स पार्टनरबद्दल ही विचारा. त्याला कशा प्रकारची लोक आवडतात, लोकांचे घरी येणे-जाणे कसे वाटते याबद्दल ही विचारा.

- Advertisement -

-पार्टनरच्या प्राथमिकता जाणून घ्या
तुम्ही पार्टनरला विचारु शकता की, त्याच्या आयुष्यातील प्राथमिकता काय आहेत. तसेच त्याला लग्नानंतर परिवारासोबत एकत्रित रहायचे आहे की, सिंगल रहायचे आहे.


हेही वाचा- पत्नीला माझे आई वडील नको…

- Advertisment -

Manini