Monday, April 15, 2024
घरमानिनीRelationshipएक मिठी आणि सगळे आजार गायब..

एक मिठी आणि सगळे आजार गायब..

Subscribe

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती ही स्ट्रेसखाली जगत असते तेव्हा ती डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. पण तुम्हाला ठाऊक आहे का? एखादी व्यक्ती जर या समस्येतून जात असेल तर तिचा पार्टनरच यासाठी बेस्ट थेरपिस्ट म्हणून काम करू शकतो.

अनेक संशोधकांच्या मते, पार्टनरची साथ आणि प्रेम हे माणसाला अनेक आजारांपासून वाचवू शकते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. आपल्याला फक्त बोलण्याची गरज आहे. तुमच्या पार्टनरशी बोलणे, तुमच्या भावना शेअर करणे हे एका थेरेपीसारखेच काम करते आणि तुमच्या पार्टनरला सर्वोत्तम थेरेपीस्ट बनवते.

- Advertisement -

benefits of hugging powerful physical and mental health benefits of hugging bml | Benefits of Hugging: गले लगाने के शारीरिक और मानसिक स्वास्थ्य लाभ जानिए...

पार्टनरची साथ आहे जादुई टॉनिक –
जोडीदाराची साथ म्हणजे एक प्रकारचे टॉनिक आहे. पार्टनरशी संभाषण केल्याने आयुष्य निरोगी आणि आनंदी राहते. पार्टनर सोबत राहिल्याने तुम्हाला भावनिक सुरक्षितता जाणवते. पार्टनरचा हात धरणे, त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहणे, त्याच्याशी संवाद साधने या सर्व गोष्टींमुळे स्ट्रेस कमी होतो. जर कोणी विवाहित किंवा रिलेशनशिपमध्ये असेल तर पार्टनरची साथ तुमच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असते.

- Advertisement -

पार्टनरचे म्हणणे ऐका –
स्त्रिया या इमोशनल असतात. त्यांचे केवळ इतकंच म्हणणे असते की, पार्टनरने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले पाहिजे. भले ते पार्टनरच्या पालकांशी संबंधित असो. बस तिचे म्हणणे ऐकावे, अशी तिची इच्छा असते. अशा वेळी पतीने तिच्या मनातील स्थिती ऐकून तिला प्रेमाने मिठी जरी मारली तर मुलीची तक्रार बऱ्याच अंशी दूर होऊ शकते. एका रिपोर्टनुसार पार्टनरशी असलेली भावनिक आणि शारीरिक जवळीक ही अनेक आजारांवर उपाय ठरली आहे. आपल्या पार्टनरला १० सेकंड मारलेली मिठीसुद्धा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करते.

दुखापत लवकर बरी होते –
कपल्समधील पॉझिटिव्ह रिलेशन जखमा किंवा दुखापती लवकर भरण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, जे कपल एकेमकांसोबत आनंदी असतात आणि एकमेकांशी प्रेमाने संवाद साधतात, त्याच्या जखमा लवकर बऱ्या होतात.

पार्टनरला मिठी मारून झोपल्याने थकवा दूर होतो –
पार्टनरचा हात धरून झोपल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. परिणामी व्यक्तीचा थकवा आणि स्ट्रेस दूर होतोच सोबत व्यक्तीचे आयुर्मान देखील वाढते. एका सर्वेक्षणानुसार, आनंदी विवाहित कपल अविवाहित कपलपेक्षा ५८ % जास्त जगतात. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांची ही समस्या पार्टनरसोबत मिठी मारून झोपल्याने कमी होते.

महिलांमध्ये मायग्रेनची समस्या दूर होते –
महिलांच्या शरीरात नेहमीच हार्मोन्समध्ये चढ-उतार होत असतात. विशेषतः इस्ट्रोजेनचा चढउतार वाढतो तेव्हा महिलांना मायग्रेनचा झटका येतो. एका संशोधनात असे दिसून आले की, स्त्रियांमध्ये मायग्रेनचा त्रास जाणवण्यामागे ‘अनहॅप्पी मॅरीड लाइफ’ हे कारण होते. अनेक संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे की चांगले सेक्स लाईफ मायग्रेन दूर ठेवते.

 

 


हेही वाचा ;  हेल्दी sex life साठी डाएट मध्ये घ्या ‘हे’ व्हिटॅमिन

 

- Advertisment -

Manini