बालपणीचा उंबरठा ओलांडला की कधी तारुण्य येते हे कळत नाही. मित्रमैत्रिणींसोबत मजामस्ती करणारे ते दोघे अचानक नवरा-बायको होतात आणि नवनव्या जबाबदारी अंगावर पडू लागतात. मात्र, अनेकांच्या बालिश गोष्टी या तश्याच राहतात. अशावेळी जोडीदार जर भावनिकदृष्ट्या मजबूत नसेल तर तेव्हा नाते टिकवून ठेण्यासाठी किंवा ते पुढे नेण्यासाठी कठीण होऊन जाते. नातेसंबंधाचा दुःखद अंत देखील होण्याची शक्यता असते.
बालिशपणाच्या गोष्टी करणे टाळले पाहिजे?
- स्वतःच्या भावनांवर कंट्रोल न ठेवणे.
- समजूतदारपणा सोडणे किंवा छोट्याछोट्या गोष्टींवर रागावणे.
- फक्त स्वतःचाच फायदा बघणे.
- संकटसमयी जोडीदाराला साथ न देणे.
- केवळ स्वतःचा विचार करणे.
- निर्णय घेताना केवळ पार्टनवर अवलंबून असणे.
- फक्त स्वतःच्या गरजांचा विचार करणे.
इमोशनल मॅच्युरिटी म्हणजे काय?
नात्यात मॅच्युरिटी असणे खूप गरजेचे असते. उदाहरण दयायचे झाल्यास, लहान बाळ केवळ स्वतःचाच विचार करते. दुधासाठी रडताना तो केवळ भुकेसाठी रडतो. त्याची आई कोणत्या स्थितीत आहे हे त्याला ठाऊक सुद्धा नसते. पण जसजसे वय वाढत जाते तसतशी मुले फक्त त्यांच्या चिंता सोडून आसपासचे वातावरण समजून घेऊन निर्णय घेऊ लागतात. पण कधी कधी संगोपनाची पद्धत, अती लाड अशी लक्षणे काही लोकांमध्ये मोठी झाल्यावरही दिसतात, ज्यात ते स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी ठेवतात. अशी विचारसरणी आई-वडील किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत चांगली असते, पण लग्नानंतर किंवा प्रेमसंबंधात आल्यानंतर ही सवय अडचणीचे कारण बनू शकते.
तज्ज्ञांच्या मते, आपण काही गोष्टींवर विचार केल्यास नात्यातील मॅच्युरिटी टिकून राहते.
- नात्यात बॉर्डर ठेवायला हवी.
- तुमच्या पार्टनरशी बोलून घ्या आणि त्याला समजावून सांगण्याचा प्रयन्त करा.
- मॅच्युरिटीचे सर्वात मोठे औषध वेळ आहे. एकमेकांना वेळ द्या. अशाने तुमच्यात सुसंवाद राहील.
- प्रॉम्ब्लेम सुटत नसतील तर कौन्सिलिंगचा पर्याय निवडा.
नात्यात प्रेम दाखवणे अत्यंत महत्वाचे –
जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले वाटत असेल तर तसे सांगा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल काळजी वाटत असेल, तर त्याच्या आरोग्याबद्दल विचारा, त्याला भेटायला जा, त्याच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी अवश्य घ्या. हे प्रेम दाखवण्यासाठी आहे. जे तेव्हाच शक्य आहे जेव्हा नात्यात मॅच्युरिटी असते म्हणजेच जेव्हा नात्यात मॅच्युरिटी येते तेव्हाच ते नाते टिकून राहण्यास मदत मिळते.,
हेही वाचा ; कोणी तुमचा वापर तर करत नाही ना, कसे ओळखाल