Thursday, February 22, 2024
घरमानिनीRelationshipनव्या सुनेचे स्वागत असे करा

नव्या सुनेचे स्वागत असे करा

Subscribe

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाला फार महत्व आहे .आपण लहानपणापासून लग्नसमारंभाला जात असतो .लग्नातील जोडपे,लग्नात देण्यात येणारी सात वचने, विधी हे सगळं आपण पाहतो.पण लग्न म्हणजे फक्त वधू-वरांना आशीर्वाद देणे किंवा वधूवरांनी सात फेरे घेणे इतकंच नाही . खरं तर लग्न म्हणजे आयुष्याचा असा टप्पा आहे ज्याने दोघांच्या आयुष्याला वेगळं वळण लागत. इथूनच त्या दोघांच्या आयुष्याला नवीन सुरुवात होते. खास करून मुलींच्या आयुष्यात बदल व्हायला सुरुवात होते. मुली जन्मदाते आई बाबा, नातेवाईक इतकंच नाहीतर ज्या घरात त्या लहानाच्या मोठ्या होतात ते घर सोडून सासरी येतात. त्यामुळे नवीन सुनेला समजून घेणं हे नवऱ्यासोबत सासरच्या लोकांचीही जबाबदारी असते.

Marriage certificate: Objectives, benefits, documents required, and marriage registration

- Advertisement -

जोडीदाराने समजून घेणे – सर्वात महत्वाचे म्हणजे नवऱ्याने समजून घेणे महत्वाचे आहे. मग लग्न लव्ह मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज जोडीदाराची साथ महत्वाची आहे. तुमच्या घरातील नियम, वातावरण ,सणवार ,स्वयंपाक याची कल्पना आपल्या पत्नीला देणे ही जोडीदाराची जबाबदारी असते. ज्याने तिला नवीन घरात रुळायला अडचण येणार नाही .

सासरही माहेर असल्यासारखेच जाणवून देणे – यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीने नवीन सुनेला आपलं समजणं खूप गरजेचं आहे .

- Advertisement -

बंधने घालणे टाळणे – हल्लीच्या मुली या स्वतंत्र विचारांच्या असतात . स्वतःच्या पायावर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्या उभ्या असतात . त्यामुळे उगाचच बंधने घालणे टाळा . कोणती गोष्ट पटत नसेल तर स्पष्टपणे बोलून घ्या.

Latest Bride Entry Concepts That Make Your Wedding Memorable. | Wedding Kalakar India

मुलगा आणि सुनेच्या भांडणात पडू नये –शक्यतो मुलगा आणि सुनेच्या भांडणात पडू नये . तसेच दोघांच्या संभाषणचा अति विचार करू नये .

दोघांना वेळ द्या – मुलगा आणि सुनेला एकमेकांसाठी एकत्र वेळ घालवू द्या . यामुळे त्यांच्यात भावनिक , मानसिक आणि शारीरिक जवळीक निर्माण होण्यास मदत मिळेल. दोघांच्या आयुष्याचे निर्णय त्यांना घेऊ द्या मात्र सल्ला विचारल्यास अवश्य द्या .


हेही वाचा ;  https://www.mymahanagar.com/manini/doubt-is-dangerous-for-relationship/676037/

- Advertisment -

Manini