Saturday, March 2, 2024
घरमानिनीRelationshipउद्धट मुलांबरोबर असं करा डील

उद्धट मुलांबरोबर असं करा डील

Subscribe

मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मुलांवर चांगले संस्कार करणे, त्यांना उत्तम सवयी लावणे हे पालकांचे परमकर्तव्य मानण्यात येते. जेव्हा मूल लहान असते तेव्हा त्याला शिकवणे आणि संस्कार देणे अधिक सोप्पे जाते. जेव्हा मुले मोठी होतात तेव्हा विचार, वागणूक आणि व्यवहार यात फरक जाणवू लागतो.

काही मुलांमध्ये मोठ्यांचा अनादर, सतत राग, हट्टीपणा, जबाबदारीने न वागणे अशा गोष्टी प्रकर्षाने जाणवू लागतात.लहान मुलांच्या चुकीच्या वागण्यावर सुरुवातीपासून नियंत्रण ठेवले नाही तर भविष्यात त्याच्या व्यक्तिमत्वावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तुमच्या मुलांमध्ये जर असा फरक जाणवत असेल तर अशा उद्धट मुलांसोबत कसे वागायचे? त्यांना कसे हाताळायचे? याबाबत काही सोप्या टिप्स पाहुयात.

- Advertisement -

कोणाशी मैत्री करत आहेत त्याकडे लक्ष द्या –
जर तुमच्या मुलाने अचानक गैरवर्तन करायला सुरुवात केली तर त्याने कोणाशी मैत्री केली आहे ते पहा. त्याचा मित्रपरिवार कोण आहे ते जाणून घ्या. संगतीचे परिणाम हे मुलांवर होत असतात.

मुलं मोबईल, टीव्हीवर काय पाहत आहेत याकडेही लक्ष द्या –
पालकांनी मुले मोबईल, टीव्हीवर काय पाहत आहेत याकडेही लक्ष गरजेचे आहे. यावरून तुम्ही त्याच्याशी कसे वागायचे हे ठरवू शकता. वेळीच लक्ष दिल्यास तुम्ही तुमच्या मुलांना सुधारू शकता.

- Advertisement -

नियम बनवा आणि पाळायला लावा या –
मुलांसाठी नियम बनविणे आणि ते पाळायला लावणे अत्यंत महत्वाचे आहे. मुले ऐकत नसतील तर चांगल्या शब्दात आणि प्रेमाने मुलांना नियमांचे महत्व पटवून द्या. याने त्यांचा राग आणि उद्धटपणा नक्कीच कमी होईल.

मारणे टाळा –
मुलांना मारणे टाळा, नाहीतर मूल अजून वाईट वागू लागेल.

मुले असे का वागतात ते जाणून घेण्याचा प्रयन्त करा –
मुलं अशी उद्धटपणाने का वागतात? हे जाणून घेण्याचा प्रयन्त करा. त्यांच्या उद्धट वागण्यामागे तुमचे मूल एखाद्या गोष्टीमुळे नाराज किंवा त्रासलेले असू शकतात. मुलांच्या मनात नक्की काय आहे? हे जाणून घ्या. याने मुलांच्या वागण्यातील बदल सुधारण्यास मदत होईल. त्यांच्या त्रासाचे कारण शोधून त्यावर उपाय केल्यास मुलांचा राग आणि उद्धटपणा नक्कीच कमी होईल.

मुलांसोबत वेळ घालवा –
अनेक मुलांची चिडचिड, त्यांचा उद्धटपणाला काहीवेळा पालकांचा वेळ न मिळणे हे कारण असू शकते. हल्ली आई-बाबा दोघेही कामाला असल्याने मुलांकडे दुर्लक्ष होते. त्यांना हवा तसा वेळ मुलांना देता येत नाही. पण, याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत वेळ घालविणे अत्यंत गरजेचे आहे.

 

 

 


हेही वाचा ; तुमच्या मुलांना यशस्वी करायचंय! तर ‘या’ सवयी लावा

 

- Advertisment -

Manini