Sunday, April 21, 2024
घरमानिनीRelationshipतुमचं मूल स्वत:ला स्मार्ट समजतं का? मग वेळीच करा कंट्रोल, नाहीतर...

तुमचं मूल स्वत:ला स्मार्ट समजतं का? मग वेळीच करा कंट्रोल, नाहीतर…

Subscribe

आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवते. ज्या मुलांमध्ये आत्मविश्वास असतो, त्यांच्यात अवघड कामही सहजतेने करण्याची हिंमत असते. आत्मविश्वास जीवनात महत्वाची भूमिका निभावत असतो. तर अतिआत्मविश्वासामुळे नुकसानही होऊ शकते. आज आपण अतिआत्मविश्वास असणाऱ्या मुलांमध्ये आढळणारी चिन्हे आणि लक्षणे जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये ही चिन्हे दिसली तर समजून घ्या की, त्याच्यात अतिआत्मविश्वास आहे आणि तो तुम्हाला दूर करण्याची गरज आहे.

विचार न करता कार्य करणे –
ज्या मुलांमध्ये अतिआत्मविश्वास जास्त असतो अशी मुले कोणतेही काम करण्यापूर्वी कसलाच विचार करत नाही. त्यांना जे काही करायचे आहे त्या गोष्टी करून ते मोकळे होतात आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. विचार न करताना काम करण्याची सवय चांगली नाही. तुमचे मूल जर असे वागत असेल तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisement -

चूक मान्य करत नाही –
अशी मुले कधीच स्वतःची चूक मान्य करीत नाही. तसेच जेव्हा कोणी त्यांची चूक त्यांना दाखवतो तेव्हा ती स्विकारतही नाही. हे अतिआत्मविश्वासाचे लक्षण असू शकते. त्यामुळे आपल्या पाल्याकडे लक्ष देऊन मुलांना चुका मान्य करायला शिकविणे हे पालकांची जबाबदारी आहे.

- Advertisement -

इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करणे –
या मुलांना असे वाटते की, ते जे काही करीत आहेत ते योग्यच आहे आणि त्या परिस्थितीबाबत त्यांच्यापेक्षा अधिक कोणी चांगला विचार करू शकत नाही. अशा मुलांना इतरांचे ऐकणे आणि सल्ला ऐकून घेणेही आवडत नाही.

अडचणींचा सामना करत नाही –
असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की अतिआत्मविश्वास असणाऱ्या मुलांमध्ये अडचणींचा तोंड देण्याचे धैर्य नसते. असा प्रसंग आल्यास ही मुले चिडचिड करतात. एखादा प्रश्न सोडवायला जास्त वेळ लागल्यास त्यांना राग येतो.

इतरांकडे दुर्लक्ष करणे –
अतिआत्मविश्वास असणाऱ्या मुलांना असे वाटते की, ते सगळ्याच गोष्टींमध्ये तज्ञ आहेत, त्यांना सगळ्याच गोष्टी माहित आहे. अशी मुले कोणी सल्ला दिला तर त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा मुलांना इतरांच्या टिक्काटिपणी ऐकण्यात रस नसतो. त्यांना कोणाचीही गरज नाही असे त्यांना वाटते.

 

 


हेही वाचा : उद्धट मुलांबरोबर असं करा डील

- Advertisment -

Manini