Sunday, April 21, 2024
घरमानिनीRelationshipमेसेजवरील भांडणं वाढवतात गैरसमज

मेसेजवरील भांडणं वाढवतात गैरसमज

Subscribe

आज काल भेटण्यास वेळ मिळत नसल्याने अनेक जण कॉल्स किंवा मेसेजवर बोलण्यास जास्त प्राधान्य देतात. बरेच कपल्स हे चॅटिंग करताना आपण पहिले असतील. कपल्सचं का अनेक जण सर्रासपणे याचा वापर करतात. पण, तंत्रज्ञानाच्या या युगात अनेक नात्यात कटुता येण्याचे कारण ठरत चाललंय ते म्हणजे मेसेजवरील भांडणं. मेसेज पाठवून ब्रेकअप होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत कारण मेसेजवरील भांडणामुळे अनेक गैरसमज वाढतात आणि त्याचा नात्यावर परिणाम दिसू लागतो.

समोरच्या व्यक्तीचा टोन लक्षात येत नाही –

- Advertisement -

मेसेजमुळे समोरची व्यक्ती कशी आहे किंवा तिचा मूड कसा आहे याची कल्पना आपल्याला येत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीच्या शब्दातील चढ-उतारावरून तो कोणत्या मानसिक स्थितीत आहे हे आपल्या लक्षात येते. दुःखात तो काही अपशब्द वापरत बोलला तर आपण त्याला तिखट उत्तर देणे टाळतो. याशिवाय ती व्यक्ती गमतीने काही बोलली तर आपण ते मनावर घेत नाही. हेच मेसेजच्या बाबतीत होत नाही. मेसेजमध्ये इमोजीचा वापर करूनही समोरच्या व्यक्तीचा टोन कोणता आहे हे ओळखणे कठीण होऊन जाते.

समोरच्याचे हावभाव दिसत नाही –

- Advertisement -

मेसेजमुळे समोरच्या व्यक्तीचे हावभाव ओळखता येत नाही आणि नात्यात गैरसमज वाढू लागतात. मेसेज वाचताना चुकीचा विचार येण्याची शक्यता अधिक असते. कारण मेसेज वाचताना समोरच्याचा चेहरा आपण पाहू शकता नाही. सवांद साधताना शब्दांच्या चढ-उतारांशिवाय चेहऱ्यावरील हावभावही महत्वाचं असतो.

संभाषणाच्या संथ गतीमुळे होणारी चिडचिड –

जेव्हा तुम्ही मेसेजवर बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या उशिरा प्रतिसादामुळे तुम्हाला राग येऊ शकतो किंवा तुम्ही पटकन प्रतिसाद न दिल्यास त्यालाही राग येऊ शकतो. त्यामुळे रागात थांबलेला व्यक्ती चुकीचे मेसेज करायला सुरुवात करतो. अशाने नात्यात गैरसमज निर्माण व्हायला सुरुवात होते.

मेसेजवर वादविवादाला तोड नसते –

तुम्ही जेव्हा कधी मेसेजवर वाद घालता तेव्हा तुम्ही जुन्या गोष्टी समोर आणून स्वतःला बरोबर करण्याचा किंवा तुमचेच खरं करण्याचा प्रयन्त करता. समोरच्याचा अपमान करणे आणि त्याला चुकीचे सिद्ध करणे हेच प्राधान्य धरण्यात येते. अशाने केवळ मेसेजवर तासनतास चर्चा होते, गैरसमज निर्माण होतात पण उपाय मात्र सापडत नाही.

 

 

 


हेही वाचा : करियर आणि लव्हलाईफ असं करा बॅलन्स

- Advertisment -

Manini