Monday, February 17, 2025
HomeमानिनीRelationshipआईलाच माहित नसतात बाळाच्या 'या' गोष्टी

आईलाच माहित नसतात बाळाच्या ‘या’ गोष्टी

Subscribe

घरी बाळ आल्यावर आईवडील आणि कुटूंबासाठी सर्वात आनंदाची गोष्ट असते. आपल्या बाळाची एक झलक पाहून सुद्धा मन प्रसन्न होते. लहान मुले इतकी गोंडस असतात त्यांना पाहताच दिवसभराचा थकवा निघून होतो. नवजात बाळासोबत थोडा वेळा घालवला की, बाळाच्या हालचाली, आवडीनिवडी आईला समजू लागतात. पण, नवजात बाळाविषयी अशा काही रंजक गोष्टी आहेत ज्या जन्मदात्या आईला देखील माहित नसतात.

पहिल्या पॉटीतून वास येत नाही –
असे म्हटतात मूल जन्माला आल्यावर पहिल्या काही दिवसात त्याच्या पॉटीतून दुर्गंधी येत नाही. याचे कारण म्हणजे मुलाच्या पचनसंस्थेमध्ये कोणतेही बॅकटेरिया नसतात त्यामुळे बाळाच्या पॉटीतून दुर्गंधी येत नाही. ही वाढत्या वयाबरोबर येते.

चेहरा सरळ ठेवतात –
जवळपास 15 टक्के बालकांना पाठीवर झोपताना त्याचे डोके डावीकडे वाळवून झोपणे पसंत करतात. त्यांची ही सवय काही महिने असते.

सुरुवातील अश्रू निघत नाही –
लहान मुले 2 ते 3 आठवड्यापासून रडायला लागतात. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाळ एक महिन्यांचे होईपर्यत बाळाच्या डोळ्यातून अश्रू निघत नाही. काही प्रकरणांमध्ये बाळ चार किंवा पाच महिन्यांचे झाल्यावर अश्रू निघू लागतात. जन्मानंतरचे 2 ते 3 आठवडे मूल अश्रू न येता फक्त रडते.

श्वासोच्छवास थांबतो –
जेव्हा लहान मुले झोपतात, तेव्हा 5 ते 10 सेकंड श्वास न घेता थांबू शकतात. आनंदी असल्यावर किंवा रडताना, ते एका मिनिटात 60 पेक्षा जास्त श्वास घेऊ शकतात. अनेकदा असे काही झाले आणि बाळाचा चेहरा काळ, निळा पडला तर पालक घाबरून जातात. पण, ही सामान्य गोष्ट आहे हे लक्षात घ्यायला हवे. पण यापेक्षा जास्त वेळ बाळाचा श्वास थांबला तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

सगळेच रंग दिसत नाही –
जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यात बाळाला फक्त काळ, पांढरा आणि राखाडी हेच रंग दिसतात. याशिवाय बाळ त्याच्या चेहऱ्यापासून फक्त 8 ते 12 इंच अंतरावर असलेल्या गोष्टी पाहू शकते. काही आठवड्यांनंतर त्याला इतर सर्व रंग दिसू लागतात.

स्वतःलाच घाबरवतात –
नवजात बालकाच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या ऐकून हसायला येईल. यातील एक गोष्ट म्हणजे नवजात बाळ स्वतःच्या रडण्याचा आवाज ऐकून घाबरते. याला मोरो रिफ्लेक्स असे म्हणतात. काही महिन्यांनी मात्र, बाळाचे घाबरणे बंद होते. याशिवाय बाळ एखाद्या जोरात आवाजा ऐकून दचकते. त्यामुळे अशावेळी बाळाला कुशीत घेणे गरजेचे असते.

 

 


हेही वाचा : Chanakya Niti : मुलांवर योग्य संस्कार करण्यासाठी ‘हे’ नियम महत्वाचे

Manini