Thursday, June 1, 2023
घर मानिनी Relationship Mother’s Day Special: बॉलीवूडच्या 'या 'अभिनेत्रींची सासूबरोबर आहे जबरदस्त बॉन्डिंग

Mother’s Day Special: बॉलीवूडच्या ‘या ‘अभिनेत्रींची सासूबरोबर आहे जबरदस्त बॉन्डिंग

Subscribe

आई आणि मुलीच्या नात्याची कोणालाच सर नसते असं म्हणतात. कारण ते नात निसर्गानेच निर्माण केलेलं असतं. पण बॉलीवूडमध्ये आपल्या लाडक्या अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांची आईपेक्षा सासूबरोबरच जास्त बॉंडींग आहे. आईपेक्षा त्यांना सासूच जास्त जवळची वाटते.

आपण आतापर्यंत टी व्ही मालिकांमधूनच असे दृश्य बघितले आहे. पण खरंतर प्रत्यक्षातही सासू सुनेच नातं हे मायलेकीच्या नात्यापेक्षा जास्त जवळचं असू शकतं हे या अभिनेत्रींना बघितल्यावर कळंत.

- Advertisement -

 

- Advertisement -

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यातही अशीच बॉंडींग आहे. जया बच्चन या स्वभावाला कडकशिस्तीच्या आहेत. सून ऐश्वर्याची त्या विशेष काळजी घेतात. अनेक पार्ट्यांमध्ये , समारंभात या सासू सूना आपल्याला एकत्रही दिसतात. ऐश्वर्याला कोणी ट्रोल केले तर जया यांना संताप अनावर होतो हे सगळ्यांनीच पाहीलं आहे. तर जया यांच्याबद्दल कोणी काही बोलले तर ऐश्वर्या त्याला खडे बोल सुनावते.

नुकतीच एका मुलीची ममा झालेली आलिया भट्टचे सासू नीतू कपूरबरोबर सासूपेक्षा मैत्रीचे नाते अधिक आहे. दोघी जणी गप्पा गोष्टी करत एकमेकांबरोबर चील करतात. शॉपिंग, लंच, डिनरच नाही तर या दोघीच रणबीरला मागे टाकून पार्टीही करतात. आलियाने तिच्या चुलबुल्या स्वभावाने आधीच नीतूचं मनही जिंकल आहे.

पठाण फेम दिपिका पादुकोण ही नेहमीच रणवीर सिंहची आई अंजू भवनानीबरोबर फोटो शेअर करत असते. माझी सासू अगदी आईसारखीच माझी काळजी घेते.त्यामुळे मी सासरी आहे असं मला कधीच वाटतं नाही असं दिपिका नेहमीच सांगत असते.

देशी गर्ल प्रियंका चोप्रा हीने अमेरिकन सिंगर निक जोनस याच्याबरोबर लग्न केलं असून मालती नावाची त्यांना मुलगीही आहे. प्रियंकाने आपल्या डेनिस मिलर या अमेरिकन सासूचंही मन जिंकल असून त्यांच्यात आई मुलीचच नातं आहे.

बेबो करीना कपूर आणि तिची सासू शर्मिला टागोर यांच्यातही आई लेकीचं नात आहे. अनेकवेळा कार्यक्रमात दोघीजणी एकमेकींची तारीफ करताना दिसतात.

आपला मराठमोळ्या रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझा आणि सासू वैशाली यांच्यात छान बॉंडींग आहे. दोघीही अनेक इवेंटमध्ये सोबत दिसतात.त्यांना बघून त्या सासू सुन कमी आणि आई लेकचं वाटतात.

राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांच नुकतंच निधन झालं. पण त्या दोघींमध्ये सासू सुनेपेक्षा मैत्रीचचं अधिक नातं होतं. राणी नेहमीच पामेला यांनी पती आदित्यला दिलेल्या संस्काराबद्दल बोलायची. त्याबद्दल ती पामेलाचे आभारही मानायची.

 

- Advertisment -

Manini