Friday, April 26, 2024
घरमानिनीRelationshipParenting Tips: ऑनलाईन जगात दिसतं तसं नसतं, मुलांना सांगा 'या' गोष्टी

Parenting Tips: ऑनलाईन जगात दिसतं तसं नसतं, मुलांना सांगा ‘या’ गोष्टी

Subscribe

सध्याच्या बदलत्या जगात सर्व गोष्टी ऑनलाईनवरच पाहिल्या जातात, केल्या जातात. अशातच लहान मुलांना सुद्धा सोशल मीडियाचे इतके वेड लागले आहे की, ते एखाद्या इंन्फ्लुअन्सरला पाहून आपण ही तसेच करावे असे वाटते. पण मुलांच्या अशा वागण्याकडे पालकांनी लक्ष देणे फार गरजेचे असते.

मुलं ही अल्लड असतात त्यांना जे छान दिसते तसेच करावेसे वाटत राहते. परंतु ऑनलाईन जगात जे काही दाखवले जाते ते सर्वच सत्य असेल असे नाही. त्यामुळे तुम्ही मुलांना सुद्धा अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा असे समजावून सांगितले पाहिजे. त्यांना पुढील काही गोष्टींबद्दल ही जरुर सांगा.

- Advertisement -

-एकमेकांशी तुलना
ऑनलाइनवर जे काही दिसते ते सर्वच खरं नसते. त्यामुळे मुलांना सुद्धा सोशल मीडियात जे पाहत आहात आणि त्याच्यानुसार त्यांना काही गोष्टी करायच्या असतील तर त्यांना समजावून सांगा. त्यांना सांगा की, ऑनलाईन जगात एकमेकांशी तुलना करु नका. कारण त्यांचे खरं आयुष्य हे वेगळे असते. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसे स्वत: ला स्विकारा.

-उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल सांगा
मुलांना सोशल मीडियाचा वापर करायला देण्यापूर्वी त्यांना तेथे काय रिस्क फॅक्टर्स आहेत याबद्दल सांगा. कारण सोशल मीडियात चुकीची माहिती, अफवा या गोष्टी सर्रास होतात. अशातच त्या मुलांच्या निदर्शनास पडल्यास मुलांचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे मुलांना कोणत्या व्यक्तींशी बोलावे, मैत्री करावे हे सुद्धा सांगा.

- Advertisement -

-ट्रोलिंग पासून दूर रहा
सोशल मीडियात कोणतीही गोष्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर खुप कमेंट्स केल्या जातात. काहीवेळेस ट्रोल ही केले जाते. जर तुमचे मुलं ही त्या ट्रोलर्स मध्ये असतील तर त्यांना हे चुकीचे आहे सांगा. याचा उलट परिणाम काय होऊ शकतो हे सुद्धा सांगा. जेणेकरुन ते यापासून दूर राहतील.


हेही वाचा- Summer Vacation… उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना शिकवा ‘या’ गोष्टी

- Advertisment -

Manini