Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Relationship Relationship- नातेसंबंधासाठी हे आहेत बेस्ट रिलेशिनशिप गुरू

Relationship- नातेसंबंधासाठी हे आहेत बेस्ट रिलेशिनशिप गुरू

Subscribe

आयुष्याच्या एका टप्प्यावर प्रत्येकाला एखाद्या अशा व्यक्तीची गरज असते जी योग्य सल्ला देऊ शकते. त्यातही तुमच्यासाठी कोणते करियर योग्य आहे हे सांगण्यासाठी हल्ली करियर काऊंन्सलर असतात. पण नात्यांच काय? ती कशी निवडावी कारण बरीच नाती ही जन्मजातच लाभतात. तर काही नाती आपल्याला निवडावी लागतात. पण या नातेसंबंधावर योग्य सल्ला देणारी दूरवरची नाही तर आपली जवळचीच माणसं असतात.

- Advertisement -

आई/वडील
आई ही प्रत्येकाचा पहीला गुरू असते. नऊ महिने आपल्या उदरात वाढवणाऱ्या आपल्या अपत्याला काय हवे, काय नको त्याच्यासाठी काय योग्य आहे हे तिला न सांगताही ओळखता येते. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या लहानसहान समस्या तुम्ही आईबरोबरच शेअर करायला हव्यात.

- Advertisement -

बहीण/भाऊ
तुमची पहीली मैत्रीण जर कोणी असेल तर ती असते तुमची बहीण. मग ती मोठी असो किंवा लहान. पण तुमच्याच बरोबर लहानाची मोठी झालेली बहीण तुमची बेस्ट फ्रेंड असते. यामुळे तुम्ही तिच्यापुढे जरुर मनमोकळं करावं. ती तुम्हाला जवळून ओळखते त्यामुळे तिचा सल्ला तुमच्यासाठी नक्की फायेदशीर ठरणारा असेल.

विवाहीत मैत्रीण/ मित्र
तुमच्या वैवाहीक आयुष्यात जर सगळं काही आलबेल नसेल तर विवाहीत मैत्रीणीचाय मित्राचा नक्की सल्ला घ्या. कदाचित तिच्याशी /त्याच्याशी बोलताना तुम्हांला
मार्ग सापडेल.

 

 

 

- Advertisment -

Manini