Wednesday, February 21, 2024
घरमानिनीRelationshipRelationship : पार्टनरसोबत संबंध बिघडू लागल्यास असे सावरा नाते

Relationship : पार्टनरसोबत संबंध बिघडू लागल्यास असे सावरा नाते

Subscribe

आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागतो. काही दिवस असे असतात जे खुप आनंदात जात असतात. पण काही दिवस असे ही येतात तेव्हा असे वाटते की, सर्वकाही संपलेय. या दोघांमधील दुवा म्हणजे व्यक्तीला आयुष्यात पुढे जाण्यासाठी कामी येतो तो म्हणजे आशा आणि प्रयत्न. ठिक याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला आपल्या पार्टनरसोबत काही उत्तम आणि वाईट दिवसांचा सामना करावा लागतो. ही एक सर्वसामान्य बाब आहे जी प्रत्येक विवाहित कपलमध्ये होते.

परंतु काही वेळेस असे होते की, आपल्या नात्याला अधिक मजबूत करण्यासाठी नक्की काय करावे हे कळत नाही. पार्टनर सोबत हेल्दी रिलेशनशिप कसे निर्माण करावे असे विविध प्रश्न मनात येतात. अशा गोष्टींवर वेळीच तोगडा काढला तर नाते मोडण्याचा प्रश्नच येत नाही.

- Advertisement -

एकमेकांना स्पेस द्या


बिघडत असलेले नाते सुधारण्यासाठी एकमेकांना स्पेस द्या. नात्यात दूरावा आला असेल तर असे जरुर करुन पहा. यावेळी तुम्हाला तुमच्या चुका कळतीलच. तसेच पार्टनरसोबत कसे वागावे हे सुद्धा समजेल.

- Advertisement -

एकाच वेळी एकत्रित झोपा


हे काही कपल्ससाठी अवघड होऊ शकते. पण यामागील कारणं अशी की, मुलांचा सांभाळ, ऑफिसचे काम, घरातील काम. या मधील काही गोष्टींवर तुम्ही सोल्यूशन काढू शकता. घरातील काम, सिनेमा पाहणे अशा काही कारणास्तव नवरा-बायकोची झोपण्याची वेळवेगळी असेल तर नात्यात वाद होऊ शकतात. असे काही रिसर्चमधून सुद्धा समोर आले आहे की, जे कपल्स एकाच वेळी झोपत नाहीत, त्यांच्यामध्ये वाद, एकमेकांशी कमी बोलणे होते.

आपल्या भावना खुलेपणाने शेअर करा


नात्यात आपल्या भावना खुलेपणाने शेअर करता आल्या पाहिजेत. पण काही जणांना ते जमत नाही. त्यांना असे वाटते की, आपण आपला विचार मांडला तर त्यामुळे पार्टनर दुखावला जाऊ शकतो. पण असे काहीही नसते. खासकरुन तेव्हा जेव्हा तुमच्यात दुरावा निर्माण होऊ लागतो. त्यावेळी खरंच एकमेकांशी खुलेपणाने बोला.

भांडा पण एकमेकांच्या भावनांचा सुद्धा विचार करा


असे म्हटले जाते की, ज्या व्यक्तीवर आपले जास्त प्रेम असते त्याच्याशी भांडण होते. पण भांडणानंतर जेव्हा एकमेकांना समजून घेतले जाते तेव्हा प्रेम वाढते. पण भांडण करणे ही चुकीचे नाही. पार्टनरचे चुकत असेल तर जरुर बोला. पण त्यावेळी तुम्ही काय शब्द वापरताय याकडे सुद्धा लक्ष द्या. पार्टनरच्या भावनांचा यावेळी विचार करा.

लहान-लहान गोष्टींमधून सरप्राइज द्या


लहान लहान गोष्टींमधून पार्टनरला सरप्राइज देणे विसरु नका. यामुळे पार्टनर सोबत आयुष्यभर आनंदी आयुष्य जगता येईल. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की, आपल्या पार्टनरने आपले कौतुक केले पाहिजे, त्याने ही एखादे सरप्राइज दिले पाहिजे. नेहमीच पैशांनी खरेदी करुन गिफ्ट देऊ नका. तुमच्या भावनांनी सुद्धा पार्टनरला सरप्राइज करु शकता.


हेही वाचा-Live in मध्ये राहण्याआधी जाणून घ्या तुमचे अधिकार

- Advertisment -

Manini