Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipSexting करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Sexting करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

Subscribe

मित्रमैत्रिणींसोबत मेसेजवर आपण मनमोकळेपणाने बोलतो. तर प्रत्येक नात्यात एक मर्यादा असतात आणि त्या मर्यादेतच आपण त्यांच्याशी बोलतो. परंतु सेक्सटिंग हे अशा प्रकारचा पर्याय आहे जो सध्या फार लोकप्रिय असून ज्याला आपण रोमँन्टिक रुपात पाहतो. यामुळे आपण समोरच्या व्यक्तीसोबत संपर्कात राहण्यासह स्पाइसी गोष्टींबद्दल बोलण्याचा अनुभव देतात. सेक्सटिंग करणे जेवढे मजेशीर वाटते तेवढेच ते रिस्की सुद्धा आहे. त्यामुळे एखाद्यासोबत सेक्सटिंग करताना पुढील काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. (Advice for sexting)

-सहमती गरजेची
एकमेकांसोबत सेक्सटिंग करताना हे सुनिश्चित करुन घ्या की, दोघे ही त्यासाठी सहमत आहेत. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक गतिविधीत सहमती फार गरजेची असते. खासकरुन ऑनलाईनवेळी. एखादा खासगी फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यापूर्वी तु्म्ही एकमेकांच्या सहमतीने करताय ना याची खात्री करुन घ्या.

- Advertisement -

-तुम्ही पाठवलेल्या फोटो-व्हिडिओबद्दल सतर्क रहा
नेहमीच लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादा मेसेज किंवा फोटो-व्हिडिओ समोरच्या व्यक्तीला पाठवता तेव्हा तो तुमच्या नियंत्रणाबाहेर असतो. तुम्ही पाठवलेल्या काही गोष्टींबद्दल नेहमीच सतर्क राहिल पाहिजे. तुम्हाला कळले पाहिजे की, या गोष्टीमुळे तुम्हाला भविष्यात एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

- Advertisement -

-चेहरा दाखवू नका
जर तुम्ही एखाद्यासोबत सेक्सटिंग करत असाल तर नेहमीच तुमच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. यावेळी तुमचा चेहरा दाखवण्याची रिस्क अजिबात घेऊ नका. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्यासकट फोटो पाठवत असाल तर समोरचा व्यक्ती त्याचा गैरफायदा घेऊन तुमचे फोटो मॉर्फही करु शकते हे लक्षात ठेवा.

-धोक्यांपासून सावध रहा
सेक्सटिंग करणे फार रिस्की असते. ज्यामध्ये तुम्ही पाठवलेले मेसेज, फोटो-व्हिडिओ समोरच्या व्यक्तीला मिळतात. तो त्याचा कशा प्रकारे वापर करेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पाठवलेल्या फोटो-व्हडिओमुळे तुमचे भविष्य धोक्यात येणार नाही ना याची काळजी घ्या. (Advice for sexting)

-आदराने वागा
एखाद्यासोबत सेक्सटिंगल करताना त्याच्या भावनांचा सन्मान करा. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर एखादी गोष्ट करण्यासाठी दबाव टाकू शकत नाही. तसेच ऑनलाईन सेक्सटिंग करताना समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा सन्मान न करणे हे फार चुकीचे आहे.


हेही वाचा- तुमच्या पार्टनरचं अफेयर्स सुरू आहे का? कसे ओळखाल

- Advertisment -

Manini