Thursday, April 25, 2024
घरमानिनीRelationshipSuicide In Children : लहान मुले आत्महत्येचा मार्ग का स्वीकारतात; काय म्हणतात...

Suicide In Children : लहान मुले आत्महत्येचा मार्ग का स्वीकारतात; काय म्हणतात तज्ञ

Subscribe

जग जसजसे प्रगत होत आहे, तसतसे मुलांवरही अभ्यासाचे दडपण हे वाढत जात आहे. आजच्या शाळकरी मुलांमध्ये (Children) समजूतदारपणा कमी असल्यामुळे नैराश्य येणे सामान्यबाब झाली आहे. नुकताच बोर्डच्या परीक्षेचा निकाल लागले आहेत. यात न्यूज चॅनलमध्ये तुम्ही वाचले असेल किंवा एकले असेल की, बोर्डाचा निकाल येण्यापूर्वी किंवा निकालानंतर परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे मुले ही आत्महत्या (Suicide) करतात. एवढ्या लहान वयात मुले आत्महत्या (Suicide In Children)  कशी करू शकतात, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात.

दरम्यान, विद्यार्थ्याने नापास झाल्यामुळे आत्महत्या करतात. अखेर इतक्या लहान वयात मुलाने अभ्यासात सुधारणा करण्याऐवजी आत्महत्या केली. शेवटी हे विचार मुलांच्या मनात कसे येऊ शकतात? अशाच प्रश्नाबाबत ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर यांच्याशी बोलल्या की, मुलांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आणि अडचणी येतात, ज्यामुळे त्यांच्या मनात निराशेची भावना निर्माण होते. त्यामुळे आत्महत्येसारखे विचारही येतात. मुलाच्या मनात आत्महत्येचे विचार येण्याची अनेक कारणे असू शकतात.

- Advertisement -

जाणून घ्या कोणत्या कारणांमुळे मुले आत्महत्येसारखे मोठे पाऊल टाकतात

मानसिक समस्या

- Advertisement -

मुले नैराश्य, चिंता किंवा इतर मानसिक आरोग्य समस्यांशी संघर्ष करत असतात. ज्यामुळे मुलांमध्ये आत्महत्येचे विचार येण्याचा धोका वाढू शकतो.

घाबरविणे-धमकविणे

शाळेत, ऑनलाइन किंवा त्यांच्या समुदायातील लोकांकडून गुंडगिरीचा अनुभव घेतल्याने मुलाच्या आत्मसन्मानावर आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ज्यामुळे मुलांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात.

कौटुंबिक समस्या

पालकांचा घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार किंवा मुलांकडे दुर्लक्ष यांसारख्या कौटुंबिक संघर्षांचा मुलाच्या भावनांवर मोठा परिणाम होतो.

शैक्षणिक दबाव

शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचा दबाव, पालक, शिक्षक किंवा सामाजिक अपेक्षा. त्यांचा काही मुलांवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ते आत्महत्येचा विचार करू शकतात. अयशस्वी झाल्यामुळे आपल्या मुलाचे स्वतःचे नुकसान होऊ शकते, अशी पालकांना भिती असल्याने पालक या टिप्सचे अनुसरण करू शकतात

मुक्त संवाद

पालकांनी मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करावे. जेणे करन मुले स्वतःबद्दल उघडपणे बोलतील आणि मुलांच्या मनातील असलेली चिंता ते बेधडकपणे बोलतील. तेव्हा मुलांच्या प्रत्येक समस्या काळजीपूर्वक ऐका.

तज्ञांची मदत घ्या

मुलांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशक यांची मदत घ्यावी. जेणे करून मुलांच्या समस्या समजून घेण्याचे कौशल्य आहे. ते तुमच्या मुलाच्या गरजेनुसार, योग्य समर्थन आणि मार्गदर्शन देऊ शकतात.

मुलांशी जवळीक वाढवा

तुमच्या मुलाच्या जीवनात स्वारस्य दाखवा आणि सक्रियपणे सहभागी व्हा. जसे शालेय कार्यक्रमात सहभागी व्हा, त्यांच्या छंदात सहभागी व्हा. याशिवाय मुलांसोबत चांगला वेळ घालवा, अशा प्रकारे पालक आणि मुलामध्ये एक मजबूत नाते तयार होते.

स्वतःला शिक्षित करा

आत्महत्येच्या विचारांची चिन्हे आणि त्यांच्याशी संबंधित घटकांबद्दल जाणून घ्या. हे तुम्हाला तुमच्या मुलामधील संभाव्य चिन्हे ओळखण्यात आणि योग्य मदत करू शकतात.

- Advertisment -

Manini