जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा पार्टनरने सतत आपली विचारपूस करावी, कायम आपल्या आसपास राहावे अशी इच्छा निर्माण होते. पार्टनरचा संपूर्ण वेळ हा आपल्याला मिळावा अशी ज्याची त्याची इच्छा असते. पण, आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य नाही. बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही दिवसभरात बिझी असता तेव्हा तुम्हाला पार्टनरची जास्त आठवण येऊ शकते. तुम्ही त्याचे सोबत असणे मिस करू शकता.
पार्टनरची कितीही गरज असली तरी आयुष्यात पार्टनरवर जास्त प्रमाणात डिपेंडेंड असणे चांगले नाही. व्यक्तीने आयुष्यात कायम आत्मनिर्भर असावे. आज आम्ही तुम्ही अशी काही लक्षणे सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही सहज ओळखू शकाल की, नात्यात तुम्ही पार्टनरवर डिपेंड आहात की नाही?
नात्यात पार्टनरवर डिपेंड असण्याची लक्षणे –
तुमचा मूड पार्टनरच्या मूडवर अवलंबून असणे –
नात्यात तुमचा पार्टनर उदास असेल तर तुम्ही सुद्धा उदास असायलाच हवे असे नाही. जर तुम्ही एखादया गोष्टीने टेन्शनमध्ये असाल आणि त्याच वेळी तुमचा पार्टनर आनंदी असेल तर यासाठी स्वतःला अजिबात दोष देऊ नका. कारण तुमची मानसिक स्थिती वेगळी असू शकते. एखाद्याचा मूड दुसऱ्यावर अवलंबून असणे योग्य नाही.
एकट्याने खरेदी करता न येणे –
काही लोकांना एकट्याने खरेदी करता येत नाही तर काही नात्यात आपण असे पाहतो की, पार्टनरला सोबत घेऊन खरेदी केली जाते जेणेकरून ते त्यांना त्यांच्या आवडीबद्दल विचारू शकतील. कारण अशी व्यक्ती स्वतःच्या आऊटफिटबाबतीत गोंधळलेली असते. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर तुम्ही पार्टनरवर डिपेंड राहिलात तर पार्टनर तुमच्या या वागण्याला कंटाळू शकतो.
पार्टनर सोडून जाण्याची भीती असणे –
जर तुम्हाला तुमच्या नात्यात सतत पार्टनर सोडून जाण्याची भीती वाटत असेल तर हे सुद्धा पार्टनरवर डिपेंड असण्याचे लक्षण आहे. नात्यात पार्टनर तुम्हाला सोडून जाण्यावरून भीती वाटणे, त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकणार नाही अशी भावना निर्माण होणे, ही परिस्थिती नंतर धोकादायक बनू शकते. एखाद्या व्यक्तीवर तुमचे कितीही प्रेम असले तरी एकटे राहण्याचे कौशल्य अवश्य शिकले पाहिजे.
हेही वाचा : Phubbing : नात्यात दुरावा आणणारे फबिंग