Sunday, February 25, 2024
घरमानिनीRelationshipValentine Day : 'या' कारणासाठी सेलिब्रेट केला जातो 'व्हॅलेंटाईन डे'

Valentine Day : ‘या’ कारणासाठी सेलिब्रेट केला जातो ‘व्हॅलेंटाईन डे’

Subscribe

सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट केला जात असून 14 फेब्रुवारी रोजी जगभरातील प्रेमी आपल्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन-डे साजरा करतात. सध्याच्या काळात व्हेलेंटाईन डेबाबत तरुण पिढीमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. साधारणत: प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. परंतु अनेकांना हा दिवस नक्की का साजरा केला जातो, यामागचे महत्त्व काय आहे, हा प्रश्न पडतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हेलेंनटाईन-डे मागचा इतिहासात सांगणार आहोत.

व्हेलेंनटाईन-डे मागचा इतिहास

Saint Valentine, 19th century. Artist: Anonymous available as Framed Prints, Photos, Wall Art and Photo Gifts

- Advertisement -

 

व्हेलेंटाईन डे बद्दल ‘ऑरिया ऑफ जैकोबस डी वाॅरिजीन ‘ ह्या पुस्तकात उल्लेख केला होता. त्यामध्ये असे सांगण्यात आलं आहे की, ही कथा रोमन किंग क्लॉडियस आणि संत व्हॅलेंटाईन यांची आहे. संत व्हेलेंटाईन हे प्रेमाला प्रोत्साहन द्यायचे. त्याच काळात रोमचा राजा क्लॉडियसचा प्रेमविवाहावर विश्वास नसल्याने त्याचा प्रेमप्रकरणाला तीव्र विरोध होता. त्यामुळे राजा क्लॉडियसने आपल्या सैनिकांना लग्न करण्यास मनाई केली होती, पण संत व्हेलेंटाईनने अनेक सैनिकांना लग्नासाठी तयार केले आणि त्यांचे लग्न लावून दिले. राजाला राग अनावर झाल्याने त्याने 14 फेब्रुवारी 269 रोजी संत व्हॅलेंटाईनला फाशीवर चढवलं. तेव्हापासून 14 फेब्रुवारीला व्हेलेंनटाईन-डे प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केले जाऊ लागले.

- Advertisement -

व्हॅलेंटाईन-डे कसा सुरू झाला?

व्हॅलेंटाईन डेची सुरुवात एका रोमन सणातून झाली. 496 मध्ये जगात पहिल्यांदाच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. रोममध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत ‘Lupercalia’ नावाचा उत्सव साजरा केला जायचा. या उत्सवात मुले बॉक्समधून मुलींच्या नावं काढायची. उत्सवादरम्यान ही जोडपी प्रेयसी-प्रियकर बनून फिरतात आणि कधी-कधी ते लग्न देखील करतात. नंतर तिथल्या चर्चमध्ये हा दिवस उत्सव म्हणून आणि संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ सणाप्रमाणे साजरा करण्यास सुरूवात केली.


हेही वाचा :

Valentine Day : एकच दिवस नाही तर, संपूर्ण “व्हॅलेंटाईन वीक” प्रेम करा व्यक्त

- Advertisment -

Manini