Wednesday, February 21, 2024
घरमानिनीRelationshipकपल पॉज म्हणजे काय? नक्की काय आहेत याचे परिणाम

कपल पॉज म्हणजे काय? नक्की काय आहेत याचे परिणाम

Subscribe

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल जाणवतात. ज्याचा जीवनशैली आणि तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. मध्यम वयाच्या सुरुवातीस म्हणजे 40 ते 50 वर्षाच्या काळात शरीरात अनेक बदल होतात, ज्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधावरही होतो.

रोममधील एका युनिव्हर्सिटीने यावर संशोधन केले आहे. यानुसार मध्यमवयीन जोडपी एकत्र ‘कपल पॉज’च्या टप्प्यातून जातात. तसेच संशोधनातून असेही समोर आले आहे की, मध्यम वयानंतर व्यक्तीच्या शारीरिक,मानसिक आणि नातेसंबंधातील बदलांचा कपल्सच्या लैगिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.

कपल पॉजची लक्षणे दोघांचीही एकसाथ वाढतात –
महिलांना 40 ते 50 च्या दरम्यान मेनोपॉजमधून जावे लागते. तर पुरुषांना मध्यम किंवा वृद्धपकाळात टेस्टोस्टेरॉनमध्ये घट जाणवायला सुरुवात होते. ज्याला ‘अँड्रोपॉज’ असे देखील म्हटले जाते. यामुळे पुरुषांना थकवा, निद्रानाश, अंथरुणात अडचण आणि वजन वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार एक जोडीदारातील बदल दुसऱ्या जोडीदारावर परिणाम करू शकतो. म्हणजेच एका जोडीदाराच्या लैगिक समस्यांमुळे दुसऱ्याचे लैगिंक आरोग्य बिघडू शकते.

नात्यावर होतो परिणाम –
तज्ज्ञांच्या मते, एका पार्टनरचा स्ट्रेस दुसऱ्या पार्टनरलाही होऊ शकतो. ‘कपल पॉज’मुळे दोघांच्याही लैगिंक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

 

- Advertisement -

 


हेही वाचा : जोडप्यांमध्ये ‘या’ क्षुल्लक कारणांवरून होतात भांडणे

- Advertisment -

Manini